*मतदान यंत्र तयार करण्याची प्रक्रिया आजपासून* *उमेदवार किंवा प्रतिनिधींना उपस्थित राहण्याचे आवाहन*

23

*मतदान यंत्र तयार करण्याची प्रक्रिया आजपासून*

*उमेदवार किंवा प्रतिनिधींना उपस्थित राहण्याचे आवाहन*

 

गडचिरोली, दि.8 : निवडणुकीकरिता मतदान केंद्रावर जाणाऱ्या इव्हीएम मशीन तयार करण्यास 9, 10, 11 व 12 एप्रिल 2024 या तारखा निश्चित करण्यात आल्या असून या प्रक्रियेदरम्यान निवडणुक लढणारे उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी संबंधीत विधानसभा मतदार संघातील मतदार यंत्र सिलिंग करण्याच्या ठिकाणी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी संजय दैने यांनी केले आहे.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी 12-गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्र अंतर्गत 19 एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार मतदान प्रक्रिया सुरक्षित व पारदर्शक होण्याकरिता सर्व मतदान यंत्राचे विधानसभा मतदार संघनिहाय सिंलिंग (Candidate setting) करण्याची प्रक्रीया पूर्ण करण्यात येणार आहे.

यात आमगाव विधानसभा मतदारसंघातील 311 मतदान केंद्रासाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था देवरी येथे 9 व 10 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता, आरमोरी विधानसभा मतदारसंघातील 302 मतदान केंद्रासाठी तहसिल कार्यालय, देसाईगंज येथे 12 व 13 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता, गडचिरोली विधानसभा मतदारसंघातील 356 मतदान केंद्रासाठी शासकीय प्रशिक्षण संस्था गडचिरोली येथे 10 ते 12 एप्रिल दरम्यान सकाळी 8 वाजता, अहेरी विधानसभा मतदारसंघातील 292 मतदान केंद्रासाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नागेपल्ली येथे 11 व 12 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता, ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघातील 316 मतदान केंद्रासाठी शासकीय तंत्रनिकेतन ब्रम्हपुरी येथे 12 व 13 एप्रिल रोजी सकाळी 6 वाजता आणि चिमुर विधानसभा मतदारसंघातील 314 मतदान केंद्रासाठी राजीव गांधी सभागृह, तहसिल कार्यालय परिसर चिमूर येथे दिनांक 12 व 13 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता सुरक्षा कक्ष उघडण्यात येवून मतदार यंत्र सिलिंग करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. यावेळी निवडणूक लढणारे उमेदवार किंवा त्यांचे निवडणूक प्रतिनिधी यांनी उपस्थित राहावे, अशा सूचना श्री दैने यांनी दिल्या आहेत.

०००००००