*केंद्रात इंडिया आघाडी सत्तेत आल्यास विकास कामांची श्रीगणेशा सिरोंचा शहरापासून करू*

52

*केंद्रात इंडिया आघाडी सत्तेत आल्यास विकास कामांची श्रीगणेशा सिरोंचा शहरापासून करू*

 

*ना.विजयभाऊ वडेट्टीवार यांचे प्रतिपादन*

 

सिरोंचा : तालुका हे राज्याचे शेवटचं टोक आहे.या तालुक्यात अनेक प्रकारचे नैसर्गिक साधन संपत्ती आहे.आजपर्यंत या साधन संपत्तीवर आधारित उद्योग धंदे इथे उभारले असता येथील बेरोजगारांना नियमित रोजगार मिळाले असते.या तालुक्याची चित्र बदलले असते परंतु याकडे अहेरीचे घराण्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने या तालुक्याची विकास घडून आलेलं नाही,तालुक्यातील जनतेनी गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्राचे इंडिया आघाडीचे उमेदवार डॉ.नामदेवराव किरसान यांना साथ देऊन मताधिक्य देत निवडून दिल्यास व केंद्रात इंडिया आघाडीचे सरकार सत्तेत आल्यास विकास कामांची पर्व हे ऐतिहासिक सिरोंचा शहरापासून सुरू करण्याचे प्रतिपादन ना.विजयभाऊ वडेट्टीवार यांनी केले.

 

ते सिरोंचा येथे काल इंडिया आघाडीकडून जुना मच्छी मार्केटच्या पटांगणावर आयोजित लोकसभा निवडणुकीचे प्रचार सभेदरम्यान समस्त मतदार बंधू-भगिनींना अभिवचन दिले.

 

सिरोंचा येथे आयोजित प्रचारसभेला गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे उमेदवार डॉ.नामदेवराव किरसान,काँग्रेस पक्षाचे मुख्य समन्वयक अजयभाऊ कंकडालवार,काँग्रेस पक्षाचे आदिवासी सेलचे जिल्हा अध्यक्ष हनमंतू मडावी,माजी आमदार पी.आर.तलांडी,महिला नेत्या सुगुणाताई तलांडी,बाजार समिती संचालक मल्लिकार्जुन आकुला,मंदा शंकर,काँग्रेस तालुका अध्यक्ष सतीश जावजी,काँग्रेस नेते बानय्या जनगाम,राईल्ला पापय्या,ब्रह्मनंदम कोत्तागट्टू,माजी सभापती जयसुधा जनगम,माजी जि.प.सदस्या सरिता तैनेनी,शेख दीदी,महिला जिल्हा उपाध्यक्ष नीता तलांडीसह काँग्रेस व इंडिया आघाडीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

 

प्रचार सभेला पुढे संबोधित करतांना ना.वडेट्टीवार यांनी आपल्या भाषणातून केंद्र व राज्य सरकारच्या वेळकाढूपणा धोरणावर गंभीर टिका करत लोकशाही व संविधानाचे रक्षणासाठी इंडिया आघाडीचे उमेदवाराला मतदान करण्याचे त्यांनी आवाहन केले.

 

यावेळी काँग्रेस पक्षाचे अहेरी विधानसभा समन्वयक अजयभाऊ कंकडालवार यांनी आपल्या भाषणात महागाई,शेतकरी विरोधी धोरणांवर प्रकाश टाकत मोदी सरकारला सत्तेतून उखडून टाकण्यासाठी आघाडीचे उमेदवाराला मताधिक्याने निवडून देण्याची आवहान केले.अजयभाऊ कंकडालवार यांनी आपली भाषण तेलुगु भाषेतुन करत मतदारांवर प्रभाव पाडण्याचे प्रयत्न केले.

 

या प्रचारसभेत इंडिया आघाडीचे उमेदवार डॉ.नामदेवराव किरसान व काँग्रेसचे महिला नेत्या सगुणाताई तलांडी यांनीही आपल्या भाषणात केंद्र व राज्य सरकारवर सडकून टीका केले.