गडचिरोलीतील युवक स्वप्निल संगीडवार याने बाजी मारली व पीएसआय होण्याचे आपले स्वप्न पूर्ण केले

136

गडचिरोली : अराजपत्रित गट ब (पीएसआय) महाराष्ट्र लोकसेवा आयोग २०२१ चा निकाल घोषित झाला असून यात गडचिरोलीतील युवक स्वप्निल संगीडवार याने बाजी मारली व पीएसआय होण्याचे आपले स्वप्न पूर्ण केले आहे. स्वप्निल याने आपले हायस्कूलचे शिक्षण शिवाजी हायस्कूल गडचिरोली व पदवीचे शिक्षण शिवाजी महाविद्यालय गडचिरोली येथे पूर्ण केले. सन २०१६-१७ पासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची तयारी सुरू केली. लोकसेवा आयोगाचा अभ्यास करताना कोणत्याही कोचिंग क्लासचा आधार न घेता व मोठ्या शहरात न जाता आपल्याच घरी राहून अभ्यास केला. जीवनात येणारे संकट व सातत्यपूर्ण अभ्यास यावर विजय मिळवित या परीक्षेत घवघवीत यश संपादिन केले. तो निवृत्त वाहनचालक (जलसंपदा विभाग) विलासराव संगिडवार व ज्योती संगिडवार यांचा मुलगा आहे. मित्रमंडळीकडून जंगी स्वागत एमपीएससी परीक्षेचा निकाल घोषित होताच मित्रमंडळीकडून डिजेच्या गजरात व गुलाल उधळून स्वप्निलचे अभिनंदन करण्यात आले