*अशोक नेतेंची हॅट्रीकाला अहेरी विधानसभेतून ब्रेक लागण्याची शक्यता काय…?*

18

*अशोक नेतेंची हॅट्रीकाला अहेरी विधानसभेतून ब्रेक लागण्याची शक्यता काय…?*

 

गडचिरोली-चिमूर या लोकसभा मतदारसंघात एकूण सहा विधानसभा मतदारसंघाचं समावेश असून या मतदारसंघात भाजप विरुद्ध काँग्रेस असे थेट लढत होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तविण्यात येत आहे. या लोकसभा क्षेत्रात महायुतीकडून विद्यमान खासदार अशोक नेते हे तिसऱ्यांदा तर इंडिया आघाडी कडून डॉ.नामदेवराव किरसान हे पहिल्यांदाच आपले नशीब अजमवित आहे.

 

गडचिरोली -चिमूर या लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक असले तरी या निवडणुकीची खरी रंगत मात्र अहेरी विधानसभा मतदारसंघात रंगू लागलंय.या मतदारसंघात महायुतीचे उमेदवाराचे बाजूने अहेरीचे आजी-माजी मंत्री प्रचाराची धुरा संभाळत आहेत तर इंडिया आघाडीचे उमेदवाराची बाजू माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कंकडालवार यशस्वी धुरा संभाळत आहे.

 

दोन वेळा मोदी लाटेत निवडून आलेले अशोक नेते यांना यंदा मात्र अहेरी विधानसभा मतदारसंघात मोदी व स्वतःच्या विरोधी लाटेची सामना करावं लागणार असल्याची जाणकारांची मत आहे.तर दुसरीकडे इंडिया आघाडीचे डॉ.किरसान यांना मात्र या मतदारसंघात अजयभाऊ नावाचं यशस्वी रेडिमेड राजकीय चेहरा आणि मोदी व नेते विरोधी लाटेची त्यांना फायदा होणार असल्याची सगळीकडे अंदाज बांधण्यात येत आहे.

 

अहेरी विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या नेत्यांमध्ये प्रचाराची योग्य नियोजन नसल्याचे त्यांच्या प्रचार शैलीवरून दिसून येत आहे.तर दुसरीकडे इंडिया आघाडीचे उमेदवारासाठी काँग्रेसचे समन्वयक कंकडालवार यांच्या नेतृत्वात पदाधिकारी व कार्यकर्ते जोमाने प्रचार कार्याला लागल्याचे चित्र विधानसभा क्षेत्रात पहायला मिळत आहे.

 

गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात कोणाचे पारडे जड याचे अंदाज आजच लावणे थोडाफार अवघड असले तरी अहेरी मतदारसंघात मात्र काँग्रेसचे समन्वयक अजयभाऊ कंकडालवार व त्यांचे समर्थकांची प्रचारशैली हे मतदारांना लुभावत आहेत.ककडालवार व त्यांचे समर्थकांनी मोदी व नेतेंविरुद्ध सुरू ठेवलेल्या यशस्वी प्रचाराकडे मतदारांनी जर आपले कल वळविल्यास मात्र अशोक नेतेंची हॅट्रीकाला अहेरी विधानसभेतूनच ब्रेक लागण्याची शक्यता आहे.