Home Breaking News *अवैध वाळूची वाहतूक करताना टीप्पर व ट्रॅक्टर जप्त*

*अवैध वाळूची वाहतूक करताना टीप्पर व ट्रॅक्टर जप्त*

122

*अवैध वाळूची वाहतूक करताना टीप्पर व ट्रॅक्टर जप्त*

 

बल्लारपूर : अवैध वाळूची ची वाहतूक करणारे टिप्पर व ट्रॅक्टर जप्त केले. असून तहसील कार्यालय परिसरात जमा केले आहे. टिप्पर मध्ये अवैध वाळूची वाहतूक होत असल्याची माहिती मंडळ निरीक्षकांना मिळताच, त्यांनी बामणी फाट्यावर टिप्परची तपासणी केली.

यावेळी टिप्पर चालकाकडे वाळूची वाहतूक परवाना आढळून आला नाही. तसेच नांदगाव पोडे येथील ट्रॅक्टरमधून वाळूची अवैध वाहतूक करीत असताना त्याची चौकशी करून तसेच दोन्ही वाहने जप्त करून तहसील कार्यालय परिसरात जमा करण्यात आली आहेत. जप्त करण्यात आलेला टिप्पर क्रमांक एमएच ३४ बीजी ६२४७ असून ते राजुरा येथील एम. चौधरी यांच्या मालकीचा आहे.टिप्परमध्ये पाच ब्रास रेती आढळून आली. तर ट्रॅक्टर नांदगाव पोडे येथील श्रीकांत देऊळकर यांच्या मालकीचा आहे. दोन्ही वाहनांवर बल्लारपूर तालुका मंडळ निरीक्षक प्रकाश सुर्वे यांनी कारवाई केली आहे. या कारवाईमुळे अवैध रेती उत्खनन करून वाहतूक करणाऱ्यांत प्रचंड दहशत पसरली आहे.

Don`t copy text!