Home Breaking News Internship केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव.

Internship केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव.

223

Internship केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव.

 

दि. 29/04/2024 ला जि. प. हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय एटापल्ली येथे वर्ग 12 वीच्या ब्युटी अॅण्ड वेलनेस आणि हेल्थकेयर या विषयातर्गंत 80 तासाची Internship पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला.

या कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्ष म्हणून शाळेचे प्राचार्य आदरणीय चव्हाण सर, प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आदरणीय आत्राम सर, जांभोरे सर, कु. श्रीरामे मॅडम, येनगंटीवार सर,मुनघाटे सर, शहा सर,व्यवसाय शिक्षिका कु. अश्विनी हरणखेडे, कु.शेट्टे मॅडम, कु. करमरकर मॅडम, कु. ममता मॅडम, कु. लेकामी मॅडम, कु. रत्नमाला दुर्गे मॅडम, मजिल्हाचे समन्वयक सन्माननीय भैसारे सर उपस्थित होते.

१५ दिवसाच्या internship मधे काय शिकले, कसा अनुभव आला. याबद्द्ल विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.त्याचप्रमाणे शाळेचे प्राचार्य मा. श्री चव्हाण सर यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन देऊन पुढील वाटचालीस प्रोत्साहित केले.

Don`t copy text!