रोडचे बांधकाम निक्रुष्ट दर्जाचे, अभियंता बिनधास्त

37

 

रोडचे बांधकाम निक्रुष्ट दर्जाचे, अभियंता बिनधास्त

एटापल्ली-चोखेवाडा रस्त्याचे डांबरी करण करणे सुरू केले आहे व ह्याच रस्त्यावर बेली ब्रिज तथा इतर पुलाचे काम सुरू आहे.

ह्याच रस्त्यावरील पुलाचे काम केले जात असतांना खोदलेली माती न हटविल्या मुळे रस्ता अरूंद होऊन ट्रकला आवश्यक असलेला रस्ता कमी पडल्याने तीन दिवसापूर्वी एक मालवाहू ट्रक पलटला व सुदैवाने कोणत्याही प्रकारची जिवीत हाणी झाली नाही.

महत्त्वाचे म्हणजे ह्या रस्त्यावर बांधकाम करीत असलेल्या पाईप टाकण्यात येत असलेल्या पुलाच्या कामात खाली बेड टाकुन सिमेंटच्या साहित्यासह बांधणी करणे अपेक्षित आहे, परंतु सरळसरळ सिमेंटचा बेड कींवा कांक्रेटींग न करता शेतात टाकणारे पाईप प्रमाणे पाईप टाकली जात आहेत.

तेंव्हा हा काम कीती दिवस टीकेल व कीती मजबूत असेल हाही अभ्यास करण्याची संबंधित बांधकाम यंत्रणेला गरज निर्माण झाली आहे.

सर्व सामान्य माणूस हा काम बघितल्यावर तोंडात बोटे टाकुन यंत्रणेला गालबोट लावीत आहे. तेंव्हा

कार्यकारी अभियंता, मुख्य अभियंता हे एकदा तरी भेट देऊन पाहणी केल्यानंतरच कामाचा दर्जा कीती दर्जेदार आहे हे सर्व नागरीकांना माहीत होईल. “अन्यथा “तु मारत जा मी रडत जातो असेच होईल ह्या अशा दुर्लक्षितपणामुळे यंत्रणेवरील विश्वास उडल्याशिवाय राहणार नाही.