वाघाच्या हल्यात महिला ठार

53

वाघाच्या हल्यात महिला ठार

 

गडचिरोली, दि. 14 : जिल्हा मुख्यालयापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असलेल्याआंबेशिवणी नजीकच्या बामणी बिटात आज 14 मे रोजी तेंदुपत्ता संकलन करण्यासाठी गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला करुन ठार केल्याची घटना सकाळच्या सुमारास घडली. पार्वता बालाजी पाल (वय 64) रा. आंबेशिवणी असे मृतक महिलेचे नाव आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात तेंदुपत्ता हंगाम सुरु झाला आहे. जिल्ह्यातील नागरिक तेंदुपत्ता संकलन या हंगामात करीत असतात. अंबेशिवणी येथील महिला पार्वता पाल ह्या जंगल परिसरात तेंदूपत्ता संकलनासाठी इतर महिलांसोबत गेल्या होत्या दरम्यान दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला करुन ठार केले. घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली असता वनकर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. सदर घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून वाघाच्या दहशतीने तेंदुपत्ता संकलन करायचे कसे असा प्रश्न उपस्थित झाला आहे. दरम्यान मृत्काच्या कुटुंबास आर्थिक मदत करावी अशी मागणी होत आहे.