कांग्रेसच्या विजयात कार्यकर्त्यांच्या मेहनतीला यश :    महेंद्र ब्राम्हणवाडे जिल्हाध्यक्ष

71

कांग्रेसच्या विजयात कार्यकर्त्यांच्या मेहनतीला यश :

महेंद्र ब्राम्हणवाडे जिल्हाध्यक्ष

जिल्हा प्रतिनिधी

गडचिरोली जिल्हाध्यक्ष म्हणून जेव्हापासून जबाबदारी घेतली तेव्हापासून जिल्ह्यातील कानाकोपऱ्यात पक्ष बांधणी करून कांग्रेसच्या पक्षवाढीसाठी अहोरात्र मेहनत घेणारे कांग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी हा विजय म्हणजे कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे यश असल्याचे म्हटले आहे.

जिल्ह्यातील संपुर्ण तालुक्यातील समस्या प्रशासनांकडून सोडविण्यासाठी कांग्रेसने वेळोवेळी आंदोलने केली.समस्या सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचे आंदोलन, वनविभागाच्या विरोधात आंदोलन, विद्यार्थी, बेरोजगार यांच्या समस्यांना वाचा फोडणे,लोहखनिज प्रकल्पाबाबतीत वेळोवेळी घेतलेली भूमिका,जिल्ह्यात उद्योग निर्माण करून जिल्ह्यातील बेरोजगारांना काम मिळावे यासाठी प्रयत्न, मेडिगटा बाबत शेतकऱ्यांचे समस्यांना वाचा फोडणे,कोनसरी परिसरातील भूमी-अधिग्रहणाबाबत शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहणे आदी अनेक आंदोलनात जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी कांग्रेसचे उमेदवार

डॉ.नामदेवराव किरसान व इतर पदाधिकाऱ्यांना घेऊन अहोरात्र मेहनत घेऊन पक्षाचे अस्तित्व निर्माण केल्याने लोकसभेत यश प्राप्त झाले.