सोनपूर येथील ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायत प्रशासना विरोधात बेमुदत आंदोलन.

42

सोनपूर येथील ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायत प्रशासना विरोधात बेमुदत आंदोलन.

वैरागड वार्ताहर :- आरमोरी तालुक्यातील कोजबी ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या सोनपूर येथे बाहेर गावातील व्यक्तींनी आबादी जागेवरती अतिक्रमण केल्याने येणाऱ्या काळात त्या गावातील लोकांसाठी एकही जागा शिल्लक नसल्याने या अतिक्रमणाच्या विरोधात व इतर मागण्यांसाठी पेसा समिती व सोनपूर येथील सर्व नागरिकांच्या वतीने दिनांक 6 जून 2024 पासून कोजबी ग्रामपंचायत कार्यालय समोर बेमुदत साखळी आंदोलन सुरू केले असून

यापूर्वी हे अतिक्रमण काढण्यासाठी सोनपूर पेसा समिती व गावकऱ्यांनी वारंवार ग्रामपंचायत कार्यालय तथा वरिष्ठ कार्यालयांना पत्र व्यवहार केला परंतु या पत्रव्यवहाराची दखल न घेतल्याने शेवटी नागरिकांनी आंदोलनाचा पवित्र घेतला असून जोपर्यंत सोनपुर येथील अतिक्रमण पेसा समितीच्या ठरावाची अंमलबजावणी करणे,ग्रामपंचायत प्रशासनाने गाव नमुना 8 अ वर बाहेरील व्यक्तींची व जागेची गरज नसलेल्या व्यक्तींची नोंद करू नये, बाहेरील व्यक्तींचे सुरू असलेले घर बांधकाम बंद करावे,रस्त्यालगत असलेले खताचे खड्डे हटविणे,पाणी टंचाईवर उपाय योजना करणे व इतर मागण्यांसाठी सोनपुर पेसा समिती व गावकऱ्यांनी बेमुदत आंदोलन सुरू केले असून मागण्यांवर तोडगा निघत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे आंदोलकांनी सांगितले आहे.आंदोलनामध्ये रामदास डोंगरवार सुरेश तुमरेटी माजी सरपंच वैशाली डोंगरवार दर्शना वाकडे पुंडलिक सिडाम रसिका कुमरे गीता मडावी प्रीती रणदिवे रवींद्र डोंगरवार सुरेखा तूमरेटी पुष्पा गावडे सविता तुमरेटी संदीप कुंमरे देवराव चुधरी अशोक डोंगरवार रेखा डोंगरवार आकाश रणदिवे अरुण मडावी खुशाल ठाकूर उर्मिला डोंगरवार शांता ठाकूर संगीता डोंगरवार सीता डोंगरवार ज्ञानेश्वर शेंडे कुसुम बावणे दशरथ डोंगरवार अरुण डोंगरवार श्रीरंग ठाकूर लोमेश वाकडे विश्वनाथ तुमरेटी गोपाल डोंगरवार सुरज गावडे धिरज बडोले रमेश डोंगरवार व गावकरी आंदोलनात सहभागी आहेत.