*श्री अविनाश बारसागडे , हे राष्ट्रनिर्माण शिक्षक सन्मान 2024 या पुरस्काराने सन्मानित*

209

*श्री अविनाश बारसागडे , हे राष्ट्रनिर्माण शिक्षक सन्मान 2024 या पुरस्काराने सन्मानित*

दिनांक 16 जून 2024 रोजी अमरावती येथे शिक्षण सन्मान अभियानांतर्गत *राष्ट्र निर्माता शिक्षक सन्मान सोहळा 2024* पार पडला .यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कमके , केंद्र कसनसुर, पंचायत समिती एटापल्ली , जिल्हा गडचिरोली यांना *राष्ट्रनिर्माता शिक्षण सन्मान 2024* हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

श्री अविनाश बारसागडे यांनी आपल्या 18 वर्षाच्या शैक्षणिक सेवेत आजपर्यंत अनेक उल्लेखनीय अशी कामगिरी केलेली आहे. *गडचिरोली जिल्यातील आतिदुर्गम भागात सेवा देऊन विद्यार्थी गुणवत्ता वाढवण्यासाठी व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी त्यांची विद्यार्थ्यांच्या प्रति असलेली तळमळ व प्रयत्न , विद्दार्थी दत्तक पालकत्वा साठी पुढाकार.* या कार्याची दखल घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.या प्रसंगी त्यांचा अमरावती येथील आभियंता भवन येथे प्रमाणपत्र , सन्मानचिन्ह व शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

हा पुरस्कार मिळाल्याबद्धल श्री.विजय ढाकुलकर , संस्थापक अध्यक्ष , शिक्षण सन्मान अभियान , श्री. संतोष बोरकर राज्य उपाध्यक्ष , श्री बापू भोयर राज्य कार्याध्यक्ष, श्री ऋषिकेश बुरडकर गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती एटापल्ली , श्री निखिल कुमरे , शिक्षण विस्तार अधिकारी , पंचायत समिती एटापल्ली तसेच समस्त मित्रपरिवार यांनी श्री अविनाश बारसागडे सर यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.💐🙏