*_महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ यांच्या अध्यक्षतेखाली महिला मोर्चा संघटनात्मक बैठक नागपूर येथे संपन्न._*

134

*_महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ यांच्या अध्यक्षतेखाली महिला मोर्चा संघटनात्मक बैठक नागपूर येथे संपन्न._*

 

*_गडचिरोली महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा गीताताई हिंगे यांची उपस्थिती_*

 

दिनांक :- 15 जून 2024

 

(नागपूर) :- पूर्व व पश्चिम विदर्भ महिला मोर्चा संघटनात्मक बैठक महिला मोर्चा प्रदेशध्यक्षा चित्राताई वाघ यांच्या अध्यक्षतेखाली मंगलम कार्यालय नागपूर येथे पार पडली.

बैठकी मध्ये नुकताच झालेल्या लोकसभा निवडणुकीचा आढावा घेण्यात आला.

चित्राताई वाघ यांनी बैठकीला संबोधित करताना बोलल्या की, लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एक निष्ठेने काम करून सुद्धा भारतीय जनता पक्षाला विदर्भामध्ये पराभवाचा सामना करावा लागला परंतु महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी पराभवाला खचून न जाता आगामी होणाऱ्या विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला पूर्ण बहुमताने सत्तेमध्ये आणण्याचा संकल्प करून पूर्ण विश्वासाने सर्वांच्या सहकार्याने काम करू असा विश्वास महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ यांनी बैठकीमध्ये व्यक्त केला.

 

त्याप्रसंगी पूर्व व पश्चिम विदर्भातील महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा, जिल्हा महामंत्री, जिल्हा उपाध्यक्षा व महिला पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.