कनेरी येथे भव्य रबरी बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद््घाटन

126

कनेरी येथे भव्य रबरी बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद््घाटन

गडचिरोली – नजिकच्या कनेरी येथे भव्य रबरी बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद््घाटन युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे व सामाजिक कार्यकर्ते विनोद मैंद यांच्याहस्ते नुकतेच करण्यात आले.
उद््घाटन सोहळ्याचे दिपप्रज्वलन युवक काँग्रेस प्रदेश सचिव विश्वजीत कोवासे यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षक प्रदीप चुधरी तर उपाध्यक्ष ग्रामसेवक किशोर कुलसंगे होते. सहउद््घाटक म्हणून काँग्रेस कार्यकर्ते नंदू वाईलकर, काँग्रेस कार्यकर्ते संकेत बल्लमवार, योगेश धुळसे तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा.अभय लाकडे, शामराव कोलते, तंमुस अध्यक्ष राजु ठाकरे, सरपंच तुषार मडावी, उपसरपंच प्रभाकर लाकडे, वाढई, वामन घोगरे, भक्तदास कावळे, राहुल घोगरे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मंचावर उपस्थित मान्यवरांनी क्रिकेट या खेळाविषयी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे संचालन लोमेश कोलते तर आभार विकास गंडाटे यांनी मानले. यावेळी खेळाडू व परिसरातील नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी युवा क्रिकेट क्लब कनेरीचे सर्व पदाधिकारी व कार्यकत्र्यांनी सहकार्य केले.