वेलगूर येथे जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते विकास कामांचे भूमिपूजन

132

वेलगूर येथे जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते विकास कामांचे भूमिपूजन

अहेरी : पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या ग्राम पंचायत कार्यालय वेलगुर येथे ठक्कर बाप्पा आदिवासी सुधार योजना अंतर्गत ग्राम पंचायत वेलगुर अंतर्गत बोटलाचेरु येथे विहीर बांधकामाचे भूमिपूजन जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले.
बोटलाचेरु गावाच्या जवळपास पाण्याची सुविधा नसल्यामुळे पाण्यासाठी नागरिकांना खुप लांब ये-जा करावा लागत होते. त्यामुळे सार्वजनिक विहीर बांधकाम आवश्यक असल्याने जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्याकडे गावातील नागरिकांनी मागणी केली असता सदर विहीर मंजूर करण्यात आली व आज भूमिपूजन कार्यक्रम संपन्न झाला. यामुळे आता नागरिकांना सोईचे होणार आहे.
भूमिपूजनाच्या वेळी माजी सरपंच अशोक येलामुले, सरपंच किशोर आत्राम, उपसरपंच उमेश मोहूर्ले,ग्रामपंचायत सदस्य रोहित गलबले, आनंदराव कन्नाके, लक्ष्मी आत्राम, लालू करपेत, विलास गुरानुले,पोलीस पाटील मनोहर चालूरकर आदि उपस्थित होते.