*खासदार डॉ. किरसान यांनी घेतली केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट*
*1980 च्या वनकायद्यात शिथिलता आणून रखडलेल्या सिंचन प्रकल्पाला गती देण्याची केली मागणी*
गडचिरोली : खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी केंद्रीय पर्यावरण व वन मंत्री श्री भूपेंदर यादव यांची दिल्ली येते भेट घेतली व वन कायाद्यामुळे रखडलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील कारवाफा, डुमीनाला, डरकानगुडा, पिपरी रिठ, पुलखल, तुलतुली, चेन्ना हे वनबाधित सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी वन संवरक्षण कायदा 1980 शिथिल करुन मंजुरी देण्याची विनंती केली. तसेच गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्रात सतत होणारा वाघांचा व रानटी हतींचा धुमाकूळ बंद करुन होणारी जिवीत हानी रोखण्यासाठी या हिंस्त्र रानटी प्राण्यांना इतर ठिकाणी हलवून कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची विनंती केली सोबतच पिकाची नासाडी करनाऱ्या व जीवितला धोका निर्माण करनाऱ्या रानटी डुकरांचा सुद्धा बंदोबस्त करावा अशी मागणी खासदार डॉ. किरसान यांनी वनमंत्री भूपेंद्र यादव यांच्याकडे केली.