Home Breaking News *एटापल्ली तालुका पत्रकार संघटनेची कार्यकारणी गठित*

*एटापल्ली तालुका पत्रकार संघटनेची कार्यकारणी गठित*

111

*एटापल्ली तालुका पत्रकार संघटनेची कार्यकारणी गठित*

 

दिनांक ९-८-२०२४ रोजी सार्वजनिक बांधकाम विश्रामगृह एटापल्ली येथे तालुका पत्रकार संघटनेची कार्यकारणी गठीत करण्यात आली.

जुन्या तालुका पत्रकार संघटनेचा कार्यकारणी कार्यकाल संपुष्टात आल्याने व नविन कार्यकारणी गठीत करण्याची आवश्यकता असल्याने दिनांक ९-८-२०२४ रोजी लोकशाही पद्धतीने निवड प्रक्रिया पार पाडण्यात आली.

प्रथम विषय होता अध्यक्ष निवड करणे.विषयाप्रमाणे आधी चर्चा करण्यात आली ह्या विषयाकरीता शशांक श्रीहरी नामेवार ह्यांनी अध्यक्ष पदाकरिता शेषराव नामदेवराव संगीडवार ह्यांचे नाव सुचविले व ह्या नावाला महेंद्र राजगोपाल सुल्वावार ह्यांनी अनुमोदन दिले.

त्यानंतर ह्या पदाकरिता प्रतिस्पर्धी म्हणून दुसऱ्याचे नाव न आल्याने एकमताने शेषराव नामदेवराव संगीडवार ह्यांचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.

उपाध्यक्ष,सचिव,सहसचिव,कोषाध्यक्ष हे सर्व अशाच पध्दतीने प्रक्रिया पार पडली.

उपाध्यक्ष म्हणून जनार्धन नल्लावार,सचिव प्रशांत मंडल,सहसचिव राकेश तेलकुंटलवार,कोषाध्यक्ष तनुज बल्लेवार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

अशा प्रकारे तालुका पत्रकार संघटनेची कार्यकारणी गठित करण्यात आली.व त्याप्रमाणे ठराव बुकात ठराव पारित करण्यात आले आहे.

 

यात सदस्य म्हणून रविंद्र रामगुंडेवार,विनोद चौव्हान,आनंद बिश्वास,मणीकंठ गादेवार,महेंद्र सुल्वावार,तेजस गुज्जलवार,व्ही.आर.जांभुळकर,शैलेश आकुलवार,शशांक नामेवार हे उपस्थित होते.

Don`t copy text!