मनसे प्रमुख राजसाहेब ठाकरे २३ ऑगस्ट ला गडचिरोली दौऱ्यावर!
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा सन्माननिय राजसाहेब ठाकरे येत्या २१ ऑगस्ट पासून विदर्भाच्या दौऱ्यावर येणार आहेत. मराठवाड्याचा पहिला टप्पा आटोपल्यावर त्यांचा दुसरा टप्पा २० ऑगस्ट पासून सुरू होत आहे.या दौऱ्यात काही उमेदवारांची घोषणा करण्याचे संकेत आहेत.
२१ व २२ ऑगस्ट ला नागपूर,भंडारा,गोंदिया दौरा आटोपून २३ ऑगस्ट ला सकाळी १० वाजता गडचिरोली मध्ये आगमन व स्वागत. सकाळी ११ वाजता विश्रामगृह गडचिरोली येथे निरीक्षक व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत विधानसभा मतदारसंघनिहाय बैठक घेण्यात येईल व त्यानंतर पुढील दौरा चंद्रपूर,वणी,वर्धा,अमरावती,अकोला,शेगाव(बुलढाणा) करिता रवाना होतील …






