*मा.खा.श्री.अशोक जी नेते यांच्या शुभहस्ते गडचिरोलीत विविध ठिकाणी ध्वजारोहण संपन्न*
दिं. १५ ऑगस्ट २०२४
गडचिरोली:-माजी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चाचे श्री. अशोकजी नेते यांच्या शुभहस्ते आज १५ ऑगस्ट रोजी शिवकृपा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय, मा.खा.अशोकजी नेते यांच्या जनसंपर्क कार्यालय चामोर्शी रोड,गडचिरोली, वीर बाबुराव शेडमाके स्मारक गोकुळनगर गडचिरोली या विविध ठिकाणी ध्वजारोहन संपन्न झाला.
तसेच घरो घरी तिरंगा, हर घर तिरंगा अंतर्गत मा.खा.अशोकजी नेते यांच्या शाहुनगर येथील स्थानिक निवासस्थानी ध्वजारोहन सुद्धा करण्यात आले.
यावेळी स्वातंत्र्य दिनाच्या समस्त जनतेला हार्दिक शुभेच्छा दिल्या.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व ७७ वा स्वतंत्र दिन मोठ्या उत्साहाने आनंदाने,देश भावनेने प्रेरित होऊन,भारत मातेच्या गर्जनात साजरा करण्यात आला.
या प्रसंगी शिवकृपा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थी व शिक्षक कर्मचारीवृंद तसेच मा.खा.अशोकजी नेते यांच्यासह तंबाखू मुक्त व धूम्रपान मुक्त करण्याची शपथ घेण्यात आली.
यावेळी आमदार डॉ. देवराव होळी,माजी आमदार डॉ.नामदेवराव उसेंडी,जिल्हा उपाध्यक्ष तथा आदिवासी मोर्चा चे प्रभारी जिल्हाध्यक्ष डॉ.मिलिंद नरोटे,किसान मोर्चा चे प्रदेश सचिव रमेश जी भुरसे,लोकसभा समन्वयक प्रमोदजी पिपरे, जिल्हा महामंत्री गोविंद सारडा, महिला आघाडी च्या प्रदेश चिटणीस सौ. रेखाताई डोळस, युवा मोर्चा चे जिल्हाध्यक्ष अनिल तिडके,महिला मोर्चा च्या जिल्हाध्यक्षा गिताताई हिंगे, जिल्हा उपाध्यक्ष तथा मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रणय जी खुणे,जिल्हा उपाध्यक्ष डॉ. भारत खटी, तालुकाध्यक्ष विलास पा.भांडेकर, जेष्ठ नेते सुधाकर येनगंदलवार, माजी न.प.उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर,शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे,जिल्हा सचिव वर्षा ताई शेडमाके,ता.महामंत्री बंडू भाऊ झाडे,शहर महामंत्री विनोद देवोजवार, केशव निंबोड,नंदुजी काबरा, प्राचार्य दुर्गम सर,पुष्पा करकाडे,वच्छला मुंनघाटे, शामभाऊ वाढई,कान्होजी लोहंबरे,सुरेश राठोड, गणेश नेते, राकेश राचमलवार, माजी खासदार महोदयांचे सोशल मिडीया प्रमुख दिवाकर गेडाम, दिनेश नंदनवार,रवि मोहुरले,अंशु डोईजड, तसेच पदाधिकारी, कार्यकर्ते गण विद्यार्थी विद्यार्थिनी व शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.