*कोलकाता येथील बलात्कार पीडित महिला डॉक्टरची हत्या करणाऱ्या गुन्हेगारांना कठोरातील कठोर शिक्षा द्या.* _-डाॅ.सोनलताई चेतन कोवे_

48

*कोलकाता येथील बलात्कार पीडित महिला डॉक्टरची हत्या करणाऱ्या गुन्हेगारांना कठोरातील कठोर शिक्षा द्या.* _-डाॅ.सोनलताई चेतन कोवे_

 

*_कॅंडल मार्च व श्रध्दांजली कार्यक्रमाचे आयोजन_*

 

*कोलकाता येथील के आर जी कर वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालयातील बलात्कार पीडित महिला डॉक्टर सुवर्मा गोस्वामी यांच्या अत्याचाराच्या विरोधात जाहीर निषेध करण्यासाठी दिनांक १६ आगष्ट २०२४ रोज शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता कांग्रेस कार्यकर्त्या डॉ सोनलताई कोवे यांच्या नेतृत्वाखाली गडचिरोली येथील शासकीय विश्रामगृहात कॅंडल मोर्चा काढण्यात येणार आहे.*

*कर्तव्यावर असतांना एका महिला डॉक्टरची बलात्कार करून हत्या करणाऱ्या क्रुरकर्मा, निर्दयी गुन्हेगारांना कठोरातील कठोर शिक्षा देण्यात यावी व पीडित महिला डॉक्टर सुवर्मा गोस्वामी यांच्या आत्म्यास शांती लाभावी यासाठी कॅंडल मार्च व श्रध्दांजली वाहिली जाणार आहे. तरी उपरोक्त आंदोलनात जास्तीत जास्त संख्येने महिला व पुरुषांनी सहभागी व्हावे असे आवाहन डॉ सोनलताई कोवे यांनी केले आहे.*