Home Breaking News *…महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष गीताताई हिंगे यांचे जनसंपर्क कार्यालय गडचिरोली येथे पं. दीनदयाल...

*…महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष गीताताई हिंगे यांचे जनसंपर्क कार्यालय गडचिरोली येथे पं. दीनदयाल उपाध्याय यांची जयंती साजरी…_*

81

*…महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष गीताताई हिंगे यांचे जनसंपर्क कार्यालय गडचिरोली येथे पं. दीनदयाल उपाध्याय यांची जयंती साजरी…_*

 

दिं.२५ सप्टेंबर २०२४

 

गडचिरोली :-अंत्योदयाचे प्रणेते, प्रखर राष्ट्रवादी, एकात्म मानवतावादांचे प्रणेते,पं. दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंती निमित्य आज महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा गीताताई हिंगे यांनी त्यांचे जनसंपर्क कार्यालय गडचिरोली येथे पं.दिनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करुन अभिवादन केले.

 

*यावेळी भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्ष उपाध्यक्ष चंदाताई कोडवते, तसेच भाजपा जिल्हा सचिव वर्षाताई शेडमाके ,भाजपा जिल्हा सचिव लक्ष्मीताई कलंत्री,तसेच भाजपा जिल्हा महामंत्री सीमाताई कन्नमवार यावेळी प्रामुख्याने उपस्थित होत्या .

 

पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा जन्म मथुरा येथे २५ सप्टेंबर १९१६रोजी झाला. हे भारतीय जनसंघाचे राष्ट्रीय सचिव होते. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्यासह भारतीय जनसंघाच्या पायाभरणीत यांचा महत्त्वाचा वाटा होता. भारतीय जनसंघातून पुढे भारतीय जनता पक्षाचा उगम झाला.

 

पं. दीनदयाळ उपाध्याय १९३७ साली कानपूर येथे संघाचे स्वयंसेवक झाले व १९४२ मध्ये प्रचारक झाले. साधी राहणी व उच्च विचारसरणी हा त्यांचा स्थायीभाव होता. शास्त्रे, धर्मग्रंथ, आणि तात्त्विक ग्रंथांच्या चिंतनातून व मननातून त्यांनी ‘एकात्ममानववाद’ हा सिद्धान्त मांडला व भारतीय समाजापुढे ठेवला . आज भाजप जे काही आहे ते फक्त आणि फक्त पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्यामुळे आहे असे उद्गार भाजपा महिला जिल्हाध्यक्ष गीता ताई हिंगे यांनी यावेळी काढले.

 

यावेळी कार्यक्रमाला महिला मोर्चा च्या जिल्हा सचिव भूमिकाताई बर्डे तसेच प्रतिमा ताई सोनवणे, भारतीताई खोब्रागडे ,सुनिता ताई आलेवार ,अल्काताई पोहनकर ,वैष्णवी डोंगरे, भूमी कोंडावर तसेच भाजपाच्या महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या

Don`t copy text!