गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने शेतकऱयांच्या विविध मागण्यांसाठी अधीक्षक अभियंता महावितरण यांना घेराव
वडसा :- तालुक्यातील कोरेगाव चोप गावातील शेतकरी बांधवानी आज युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या नेतृत्वाखाली वडसा तालुक्यातील पोटगावं, कोरेगाव,विहिरगाव परिसरात डी. पी ट्रान्सफार्मर गेल्या अनेक दिवसांपासून ओव्हरलोड झालेल्या असल्याने शेतकरी बांधवांचे कृषी पंप चालत नाही, वडसा तालुक्यातील वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा त्याच प्रमाणे सौर ऊर्जा कनेक्शन व्यवस्थित चालत नाही,गडचिरोली जिल्हा मध्ये नवीन मीटर उपलब्ध नसल्याने अनेकांना नवीन कनेक्शन घेण्यासाठी त्रास सहन करावा लागत असल्याने युवक काँग्रेस च्या वतीने अधीक्षक अभियंता महावितरण यांना घेराव करून 8 दिवसा मध्ये शेतकरी बांधवांना न्याय दया अन्यथा युवक काँग्रेस तर्फे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी दिला,यावेळीअधिक्षक अभियंता गाडगे साहेब व वडसा उपअभियंता साळवे साहेब यांनी शेतकरी बांधवांना न्याय देण्याचा आश्वासन दिलं यावेळी उपस्थित जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, रजनीकांत मोटघरे,नंदू वाईलकर,नरेंद्र गजपुरे, शाम मत्ते,आबाजी बुल्ले,पांडुरंग मत्ते,कालिदास सहारे,दयाराम मत्ते,वसंता राऊत,रामदासजी बुल्ले, यशवंत मत्ते,हरिजि सहारे,चितरु गायकवाड, गजानन बुल्ले, मुरली बनपूरकर, यादव मस्के,लांजेवार, गोरव एनप्रेद्दीवार,मयूर गावतुरे सह युवक काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते