*_मौजा-घोट येथील से.निवृत प्राचार्य स्व.किशोर पोरेङ्डीवार यांचे दुःखद निधन; मा. खा. अशोकजी नेते यांची निवास स्थानी सांत्वन भेट_*

75

*_मौजा-घोट येथील से.निवृत प्राचार्य स्व.किशोर पोरेङ्डीवार यांचे दुःखद निधन; मा. खा. अशोकजी नेते यांची निवास स्थानी सांत्वन भेट_*

 

दिं.२२ नोव्हेंबर २०२४

 

मौजा-घोट (ता. चामोर्शी जि.गडचिरोली) येथील से.निवृत प्राचार्य स्व.किशोर पोरेङ्डीवार यांचे आज पहाटे सकाळी ५.३० वा.दरम्यान हृदय विकाराच्या झटक्याने दुःखद निधनाने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.ते अशोकजी पोरेङ्डीवार यांचे बंधू असून लगाम येथे प्राचार्य या पदावरून नुकतेच सेवा निवृत होऊन त्यांचे आलापल्ली या ठिकाणी वास्तव्याने होते.

 

स्व.किशोर पोरेङ्डीवार यांच्या निधनाची वार्ता भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा माजी खासदार अशोकजी नेते यांना कळताच त्यांनी तातडीने त्यांच्या मुळ गावी घोट या निवासस्थानी भेट देऊन यासोबतच पोरेङ्डीवार कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी होऊन धीर देत सांत्वन केले व त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभावी,यावेळी प्रार्थना केली.

 

या प्रसंगी माजी जि.प.सदस्य तथा जेष्ठ नेते नामदेवराव सोनटक्के, सहकार आघाडी चे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक आशिषभाऊ पिपरे,जिल्हा उपाध्यक्ष अरुणजी हरडे, अशोकजी पोरेङ्डीवार

यांच्यासह पोरेड़्डीवार, कुटुंबाचे अनेक सदस्य आणि नातेवाईक उपस्थित होते.