Home Breaking News गडचिरोली : गटारात आढळला मृतदेह, घातपाताची शक्यता व्यक्त

गडचिरोली : गटारात आढळला मृतदेह, घातपाताची शक्यता व्यक्त

107

 

गडचिरोली : गटारात आढळला मृतदेह, घातपाताची शक्यता व्यक्त

 

: गडचिरोली शहरात एक धक्कादायक घटना घडली असून, येथे मूल मार्गावरील रिलायन्स पेट्रोल पंपाच्या विरुद्ध दिशेने असलेल्या गटारात एक मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृतदेहाच्या ताज्या परिस्थितीवरून घातपाताची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

सदर घटनेमुळे गडचिरोली शहरात एकच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मृतदेहाच्या आसपास बघ्यांची प्रचंड गर्दी उसळली आहे. घटनास्थळी गडचिरोली पोलीस तात्काळ दाखल झाले असून, त्यांनी पंचनामा सुरू केला आहे.

 

त्याचवेळी, गडचिरोली पोलीस ठाण्यात जिल्हा परिषदेच्या एका कर्मचाऱ्याचा तीन दिवसांपूर्वी बेपत्ता होण्याची तक्रार दाखल झाली होती. पोलीस विभाग सदर प्रकरणी पुढील तपास करत आहेत.

Don`t copy text!