Home Breaking News परभणी घटनेच्या निषेधार्थ आष्टी येथे निषेध आंदोलन

परभणी घटनेच्या निषेधार्थ आष्टी येथे निषेध आंदोलन

96

परभणी घटनेच्या निषेधार्थ आष्टी येथे निषेध आंदोलन

 

 

आष्टी:- परभणी येथे देशद्रोही समाजकंटकाने केलेल्या भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीच्या विटंबनेच्या निषेधार्थ व शहीद भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांची पोलिसांनी केलेल्या हत्येच्या निषेधार्थ बुधवार दिनांक 18.12.2024 रोजी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक आष्टी येथील चौकात महिलांच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले

 

संविधान हाच या देशाचा धर्मग्रंथ असून भारत देश संविधानावर चालतो.संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या समाजकंटकाविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा,शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या पोलीस अधीकाऱ्याविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविण्यात यावा, सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबास भरीव आर्थिक मदत करून त्यांच्या कुटुंबाचे पुनर्वसन करण्यात यावे व भविष्यात अशा घटना घडणार नाहीत याची राज्य व केंद्र सरकारने खबरदारी घ्यावी अशा विविध मागण्या आंदोलकर्त्यांच्या कडून करण्यात आल्या

यावेळी निकीता निमसरकार, राखी मडावी,इंदिरा गोंगले,माधूरी जोडे, साहील साखरकर, ममता साव, कवडू डोर्लीकर, रेखा राजपूत, रेखा सुनतकरी, अशोक साव, यांच्या सह आष्टी येथील बहुसंख्य महिला व पुरुष उपस्थित होते आष्टी पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता

Don`t copy text!