रसीदच्या खुनीला; आष्टी पोलिसांनी केली अटक
चामोर्शी : तालुक्यातील आष्टी येथील राष्ट्रीय महामार्ग ३५३ सि. रोडलगत असलेल्या खुनाल बनु कुकुडकर यांच्या घरी ०२ ते ०३ महीन्यापासून किरायाने राहण्यास असलेला इमस नामे रसीद अहमद शेख वय ५२ वर्ष राहत असलेल्या खोलीत अज्ञात इसमाने खून केल्याची घटना दिनांक १५/१२/२०२४ रोजी उघाडीस आली.
पोलिसांनी दिलेल्या सदर घटनेबाबत माहीती अशी की, मृतक याचा २ दिवसांपासून मोबाईल बंद दाखवत असल्याने त्याचे बुटीबोरी येथील नातेवाईक त्याचा शोध घेण्यासाठी मृतक रशिद अहमद शेख किरायाने राहत असलेल्या ठिकाणी दिनांक १५/१२/२०२४ रोजीचे ०३:३० वाजता पोहचले असता मृतक राहत असलेल्या रुमला बाहेरुन कुलुप लापुन असल्याचे दिसून आले. आतमधून कशाचीतरी दुर्गंधी येत असल्याने त्यांनी मृतक राहत असलेल्या रुमच्या दर्शनी भागातील खिडकीकडे बघितले असता खिडकीमधुन माशा धोंगावत असल्याचे दिसून आल्याने मृतकाच्या नातेवाईकांनी खिडकीतून डोकावून बघितले असता मृतक हा रक्ताच्या थारोळ्यात पडून असल्याचे दिसून आल्याने सदर घटनेची माहीती पोलीस स्टेशन आष्टी येथे मृतकाच्या नातेवाईकांनी दिली असता पोलीस आष्टी येथे अपराध क्रमांक २११/२०२४] कलम १०२ (१) भारतीय न्याय संहिता-२०२३ अन्य अज्ञात इसमांविरुध्द सदरचा गुन्हा नोंद करन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. विशाल काळे. यांच्यासह त्यांच्या टिमने सदर प्रकरणाच्या अनुषंगाने साक्षिदार यांची पडताळणी करून तसेच तांत्रिक तपास करुन संशयीत घरमालक नामे खुशाल वनु कुकूडकर रा. आष्टी ता. चामोर्शी, जि. गहचिरोली यास ताब्यात घेवून त्याची चौकशी केली असता त्याने सांगितले की, मृतक हा आरोपीच्या किरायाचे पूर्ण पैसे न देता रुम सोडून जात असल्याने आरोपीने मृतकास किरायाचे पैसे मागीतले असता मृतकाने किरायाचे पैसे न देता आरोपीच्या परिवाराला उद्देशून अश्लील शिविगाळी केल्याने त्याचा मनात राग धरुन रॉडने मारल्यानंतर धारदार शस्त्राने त्याचा गळा चिरुन खुन केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने आरोपीस सदर गुन्ह्याच्या तपासाकरीता अटक करण्यात आली आहे
सदरचा गुन्हा उघडकीस आणण्यात निलोत्पल पोलीस अधीक्षक गडचिरोली, श्रेणीक लोढा अपर पोलीस अधिक्षक अहेरी, अजय कोकाटे उपविभागीय पोलीस अधिकारी अहेरी यांचे मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी पोनि विशाल काळे, सोमनाथ पवार मपोउपनि भाग्यश्री जगताप मॅडम, सपोउपनि प्रतीक्षा पोशि रविद्र मेंदाळे, प्रवेश राऊत, पराग राजुरकर, प्रकाश बोरकुटे, प्रताप तोगरवार, प्रमोद दुर्ग, संतोष नागुलवार यांनी तसेच त्यांचे सहकारी टीम यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे.