Home Breaking News *आदर्श जिल्हा व तालुका पत्रकार संघ पुरस्कार वितरण सोहळा व राज्यस्तरीय मेळावा...

*आदर्श जिल्हा व तालुका पत्रकार संघ पुरस्कार वितरण सोहळा व राज्यस्तरीय मेळावा होत असलेल्या सेलू शहराला भेट..*

81

*आदर्श जिल्हा व तालुका पत्रकार संघ पुरस्कार वितरण सोहळा व राज्यस्तरीय मेळावा होत असलेल्या सेलू शहराला भेट..*

 

– *मा.श्री.एस.एम.देशमुख यांनी केली पाहणी.*

 

सेलू/प्रतिनिधी

मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा आदर्श जिल्हा व तालुका पत्रकार संघ पुरस्कार वितरण सोहळा आणि राज्यस्तरीय मेळावा हा दिनांक १ फेब्रुवारी २०२५ रोजी सेलू शहरात होणार आहे. या ठिकाणी नुकतीच

मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त मा.श्री.एस.एम.देशमुख सर यांच्या नेतृत्वा

खाली व त्यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये त्यांच्यासोबत डिजिटल मिडिया परिषदेचे प्रदेशाध्यक्ष मा.अनिल वाघमारे, मराठी पत्रकार परिषदेचे राज्य सरचिटणीस मा.सुरेश नाईकवाडे तसेच परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रभु दिपके, कार्याध्यक्ष लक्ष्मण मानोलीकर, माजी अध्यक्ष राजकुमार हाटेकर यांनी सेलू शहराचा नुकताच दौरा करून याठिकाणी कार्यक्रम स्थळाची पाहणी केली.

परभणी जिल्ह्यातलं सेलू हे तालुक्याचं शहर.. स्वच्छ आणि सुंदरतेनं नटलेलं या शहरात मराठी पत्रकार परिषदेच्या आदर्श जिल्हा व तालुका पत्रकार संघ पुरस्कार वितरण सोहळा व राज्यस्तरीय मेळावा कार्यक्रमासाठी फायनल करण्यात आलं. शहरात आगमन होताच शहराचे प्रथम नागरिक नगरपरिषदेचे तत्कालीन नगराध्यक्ष विनोद बोराडे यांच्या निवासस्थानी भेट, महत्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या साई बाबा नागरी सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालयाला देखील भेट दिली. या भेटी दरम्यान बॅंकेचे अध्यक्ष हेमंतराव आढळकर,उपाध्यक्ष चंद्रशेखर मुळावेकर यांनी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त मा.श्री.एस.एम.देशमुख सर आणि टिमचा यथोचित सत्कार केला. यादरम्यान

सेलु शहरातील प्रसिद्ध साई मंदिर येथे भेट देऊन दर्शनही घेतले. पुरस्कार वितरण सोहळा व राज्यस्तरीय मेळाव्यासाठी महाराष्ट्र राज्यभरातले दुरवरुन मुक्कामी येणाऱ्या पत्रकार बांधवांच्या निवासस्थानाची सुध्दा याठिकाणी पाहाणी केली गेली. सेलु शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत आदर्श जिल्हा व तालुका पत्रकार संघाचे पुरस्कार वितरण सोहळा व राज्यस्तरीय मेळाव्या संदर्भात उपस्थितीत सेलू शहर व तालुक्यातील पत्रकार बांधवांना योग्य त्या सुचना देण्यात आल्या. तद्नंतर शहरातील जेष्ठ पत्रकार श्री.कांचन कोरडे यांच्या निवासस्थानी स्नेह भेट,यथोचित सत्कार व भोजनानंतर मा.श्री.एस.एम.देशमुख सरांनी डिजिटल मिडिया परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे, मराठी पत्रकार परिषदेचे राज्य सरचिटणीस सुरेश नाईकवाडे, परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रभु दिपके, कार्याध्यक्ष लक्ष्मण मानोलीकर, माजी अध्यक्ष राजकुमार हाटेकर सह शहरातील तालुका पत्रकार संघाचे पदाधिकारी पत्रकार बागल, पत्रकार इलियास सह आदी बरोबर महत्वपूर्ण विषयांवर चर्चा करून सुचना दिल्या.

Don`t copy text!