*परसबाग स्पर्धेत चामोर्शी तालुक्यात ढेकणी शाळा अव्वल.*
जिल्हा स्तरीय मूल्यांकन समितीची ढेकणीच्या परसबागेला भेट.
चामोर्शी: तालुका मुख्यालयापासून जवळपास तीस किलोमीटर अंतरावर असलेल्या जिल्हा परिषद शाळा ढेकणी येथील उपक्रमशील मुख्याध्यापक राजेश्वर मुलकलवार यांनी शैक्षणिक सत्र २०२४-२५ मध्ये शालेय परिसरात लावलेली परसबाग ही चामोर्शी तालुक्यात अव्वल स्थान मिळवून जिल्हा मूल्यांकनासाठी पात्र झाल्याने जिल्हा परिषद गडचिरोली येथील लेखा अधिकारी वैभव बारेकर यांच्या नेतृत्वात कनिष्ट शिक्षण विस्तार अधिकारी बी.जे.अजमेरा यांनी जिल्हास्तरीय परसबाग मूल्यांकन समितीने जि.प.प्राथ.शाळा,ढेकणी येथे प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.ढेकणी येथील परसबाग व परसबाग संदर्भाने उपलब्ध अभिलेखाची पाहणी केली.परसबागेचा शालेय विद्यार्थ्यांना होत असलेला वापर बघून समाधान व्यक्त केले.विद्यार्थी व मुख्याध्यापकांशी सविस्तर चर्चा केली.
दरम्यान लेखा अधिकारी वैभव बारेकर, कनिष्ट शिक्षण विस्तार अधिकारी बी.जे.अजमेरा, ढेकणी शाळेचे मुख्याध्यापक राजेश्वर मुलकलवार, शाळेतील विद्यार्थी व अंगणवाडी सेविका सुमित्रा कुमोटी हे प्रामुख्याने उपस्थित होते.शाळा व्यवस्थापन समिती ढेकणीचे अध्यक्ष गजानन मट्टामी व शा.पो.आ.मदतनीस चंद्रकला मट्टामी यांनी सहकार्य केले.