गेवरा बुज. येथील शिक्षक सदानंद अब्दागिरे गडचिरोली-चामोर्शी मार्गावर झालेल्या अपघातात ठार

86

गेवरा बुज. येथील शिक्षक सदानंद अब्दागिरे गडचिरोली-चामोर्शी मार्गावर झालेल्या अपघातात ठार

गडचिरोली :वृत्तवाणी न्युज

भरगाव बोलेरो जीपने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील शिक्षक ठार झाल्याची घटना गुरुवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास गडचिरोली-चामोर्शी मार्गावर असलेल्या टोल नाक्याजवळ घडली.

सदानंद मसनाजी अब्दागिरे वय ४१रा.आळंदी ता.बिलोली जि. नांदेड, हल्ली मुक्काम हनुमान वॉर्ड चामोर्शी असे मृत शिक्षकाचे नाव असून ते चंद्रपूर जिल्ह्यातील सावली पंचायत समितीच्या गेवरा बुज.येथील शाळेत शिक्षक होते.ते यापूर्वी गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली पंचायत समितीच्या लांजी केंद्र गेदा येथे कार्यरत होते.गुरुवारी रात्री दुचाकीने (एम. एच.२६ ए.एल.०७१०) गडचिरोली येथून चामोर्शीकडे जात होते.नाक्याजवळ भरगाव जीपने (एम. एच.४० एसी ८१४०) दुचाकीला जबर धडक दिली.यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.चालक राजकी रोशन शेख वय ३७ गणेश कालनी गडचिरोली याच्यावर गुन्हा दाखल झाला.तपास उपनिरीक्षक बंडू मारगोणवार करीत आहेत.