*चाकलपेठ- मार्कंडा व मार्कंडा रोड-शंकरपूर हेटी-सावरहेटी रस्ता बांधकामाची चौकशी करा*
*माजी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांना ग्रामस्थांचे निवेदन*
*ना.देवेंद्रजी उपमुख्यमंत्री असताना माजी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी मंजूर करून आणली कामे*
*चामोर्शी येथील जनता तक्रार दरबारात केली होती गावकऱ्यांनी तक्रार*
*बांधकामात सुधारणा न केल्यास काम बंद पाडणार डॉ. देवरावजी होळी यांचा इशारा*
*दिनांक 9 फेब्रुवारी चामोर्शी*
*मागील सरकारमध्ये ना. देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री असताना एकूण 49 किलोमीटरची कामे माजी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या प्रयत्नातून मंजूर करण्यात आली होती. त्यामध्ये चाकलपेठ मार्कंडा रस्ता व मार्कंडा रोड ते शंकरपूर हेटी- सावरहेटी मार्कंडा रोडला जोडणारा रस्ता या कामांचा समावेश होता. सदर काम चांगल्या प्रकारे व्हावे याकरिता गावकऱ्यांनी कंत्राटदाराला सूचना केल्या होत्या. मात्र कंत्राटदराने कोणत्याही गावकऱ्यांना विश्वासात न घेता त्याकडे पूर्णता दुर्लक्ष करून निकृष्ट दर्जाचे बांधकाम सुरू केले. त्यामुळे या संदर्भात चामोर्शी येथील जनता तक्रार दरबारात माजी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचेकडे तक्रार केली. गावकऱ्यांच्या तक्रारीवरून संबंधित कत्राटदारांना कामाचा दर्जा सुधारण्याबाबत निर्देश दिले होते. मात्र तरीही कंत्राटदाराने निकृष्ट दर्जाचे बांधकाम करीतच असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे सदर रस्ता बांधकामाची चौकशी करण्यात यावी. दोषींवर कारवाई करावी व कामाचा दर्जा सुधारण्यात यावा अशी मागणी माजी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्याकडे गावकऱ्यांनी निवेदनाच्या माध्यमातून केली.*
*यावेळी निवेदन देतांना विलासजी चरडूके,शहर महामंत्री भाजपा,विजयजी गेडाम माजी. नगरसेवक.पूर्णानंद व्याहडकर,साईनाथजी बुरांडे जिल्हा सचिव भाजपा,दिलीपजी चलाख जिल्हा सचिव भाजपा,नारायणजी भाकरे,प्रतीकजी राठी,बंडूजी साखरे,आत्माराम रोहनकर,धोडरे सर,हिचमी सर,लालजी राऊत व गावकरी उपस्थित होते.*
*सदर बांधकाम गावकऱ्यांना विश्वासात घेऊन न केल्यास काम बंद पाळण्यात येईल असा इशारा यावेळी माजी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी प्रशासनाला दिला आहे.*