*स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडनुकीत तरुणांना संधी देणार* –काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे
*अपप्रचाराला बळी न पडता काँग्रेसची विचार तळागळात पोहचवा*….. खासदार डॉ. नामदेव किरसान यांचा युवकांना संदेश
*गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेस च्या आढावा बैठकित नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती पत्राचे वितरण*
गडचिरोली :: गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेस कमिटीची बैठक व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्राचे वितरण खासदार डॉ. नामदेव किरसान, जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, युवक काँग्रेस प्रदेश सचिव ऍड. विश्व्जीत कोवासे यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आले.
कुठलाही स्वार्थ न ठेवता निःस्वार्थ पणे कार्य करत राहल्यास त्याचे फळ नक्की मिळते म्हूणन , आपले कार्य सतत चालू ठेवा मेहनतीला यश नक्कीच मिळेल आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडनुकीत तरुणांना मोठ्या संधी दिल्या जातील असे प्रतिपादन काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी यावेळी केले.
तर खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी आपल्या मार्गदर्शनीय भाषनात अपप्रचाराला बळी न पडता काँग्रेसची विचार तळागळात पोहचवण्याचा संदेश युवकांना दिला. मागील 10 वर्षात वाढलेली बेरोजगारी, वाढती महागाई, सरकाचे खाजगीकरणाचे धोरण चव्हाट्यावर आणण्यासाठी तरुनांची भूमिका महत्वाची असल्याचे यावेळी बोलले.
या बैठकीस शहर अध्यक्ष सतीश विधाते, माजी नगरसेवक रमेश चौधरी, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितेश राठोड, तालुकाध्यक्ष वसंत राऊत, मिलिंद खोब्रागडे, प्रमोद भगत, प्रशांत कोराम, डॉ. पपु हकीम, अनुसूचित जाती सेल अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, परिवाहन सेल अध्यक्ष रुपेश टिकले,घनश्याम वाढई, मुस्ताक हकीम, नेताजी गावतुरे, अनिल कोठारे, प्रभाकर वासेकर, दिलीप घोडाम, माजी जि. प. सदस्य कविता भगत, योगेंद्र झंजाळ, महेंश जिलेवार, अनिल किरमे, मुन्ना गोंगले, कमलेश खोब्रागडे, जावेद खान, सर्वेश पोपट, चारू पोहने, गणेश उपलवार, अनिकेत राऊत, स्वप्नील बेहरे, रोशन कोहळे, राहुल वैरागडे सह इतर काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.