*राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत तेजराज नंदगिरवार राज्यात चतुर्थ*
राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत
अध्यापकाचार्य व पर्यवेक्षकीय अधिकारी गटात चतुर्थ क्रमांक मिळवण्याचा मान गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील श्री. तेजराज रमेश नंदगिरवार केंद्रप्रमुख सुरजागड यांना जाहीर झाला. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे या संस्थेमार्फत व दरवर्षी राज्यातील पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, तसेच शिक्षण विभागातील अधिकाऱ्यासाठी नाविन्यपूर्ण व विद्यार्थ्यांचा गुणवत्ता वाढीसाठी केलेल्या वैशिष्टपूर्ण नवोपक्रमासाठी स्पर्धाचे आयोजन करत असते. सदर स्पर्धाचे मुल्यांकन जिल्हा, विभागीय व राज्य पातळीवर होते. या स्पर्धेत श्री. तेजराज रमेश नंदगिरवार यांनी सादर केलेल्या “विद्यार्थ्यांना विद्युत उपकरणाची दुरुस्ती आणि विद्युत प्रवाह खंडित दुरुस्ती बाबत मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना स्वयंरोजगारशील बनविणे” उपक्रमाची दखल घेत राज्यातील शिक्षण विभागाच्या अधिकारी गटातून श्री. तेजराज रमेश नंदगिरवार यांनी चतुर्थ क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. तेजराज नंदगिरवार यांनी सुरजागड केंद्रामध्ये सदर उपक्रम राबवितात. सदर उपक्रमामुळे सुरजागड केंद्रातील काही विद्यार्थी शाळेतील आणि घरघुती विद्युत उपकरणाची दुरुस्ती करायला शिकले. NEP 2020 मध्ये इयत्ता सहावीपासून व्यावसायिक शिक्षणाचा समावेश केला असल्याने या उपक्रमामुळे विद्यार्थी स्वयंरोजगारशील बनतील. नवोपक्रमाचे मुल्याकन वर्धा जिल्हाचे डायट चे प्राचार्य डॉ. मंगेश घोगरे, यशवंतराव चव्हाण विद्यापीठाच्या प्रा. डॉ. संजीवनी महाले, माधुरी इसावे, टिळक शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या डॉ. माधुरी इसावे यांनी केले. पुरस्कराचे वितरण संचालक राहुल रेखावार, डॉ. अनुराधा ओक आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे, सहसंचालक डॉ. कमलादेवी आवटे व माधुरी सावरकर आदि मान्यवर अधिकाऱ्याच्या उपस्थित संपन्न झाला. तेजराज नंदगिरवार यांनी यांचे श्रेय गडचिरोली जिल्हाचे डायट चे प्राचार्य मा.श्री. चौरे सर, मा. वैशाली येगलोपवार अधिव्याख्याता डायट गडचिरोली, मा. डॉ. विनीत मत्ते अधिव्याख्याता डायट गडचिरोली यांना दिले.