*_पांचाळ समाजासाठी दिलेला विश्वकर्मा सभागृहाचा निधी माझ्यासाठी विश्वकर्माचे दर्शन हेच भाग्य – मा.खा. अशोकजी नेते_*
दिं. ९ फेब्रुवारी २०२५ –
गडचिरोली:- पांचाळ सेवा समिती रामनगर, गडचिरोली यांच्या वतीने श्री. प्रभु विश्वकर्मा मूर्ती प्रतिष्ठापना दिवस व विश्वकर्मा जयंती महोत्सव मोठ्या भक्तिभावाने व उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाला माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोकजी नेते प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांनी भगवान विश्वकर्माची विधीवत पूजा-अर्चा करून सर्वांना शुभेच्छा दिल्या.
*विश्वकर्मा सभागृहाची भेट आणि दर्शनाचा आनंद – अशोक नेते*
याप्रसंगी बोलताना मा.खा. अशोकजी नेते म्हणाले, “देशाचे लोकप्रिय लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी कुशल कारागिरांसाठी ‘विश्वकर्मा योजना’ सुरू केली आहे.या विश्वकर्मा योजनेत पांचाळ समाज सुद्धा मोडतो.हा समाज कारागिरी व विविध कलेत निपुण असून, त्याच्या प्रगतीसाठी मी पाच लाख रुपयांचा सभागृह निधी मंजूर केला आहे. यामुळे भगवान विश्वकर्माचे दर्शन घेण्याचे भाग्य लाभले, याचा मला विशेष आनंद आहे,” असे प्रतिपादन करत सर्वांना विश्वकर्मा जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.
या सोहळ्याला आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे, माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी, भाजपा जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम यांच्यासह पांचाळ समाजाचे अध्यक्ष प्रभाकर किरमीरवार, सचिव प्रफुल्ल विरगमवार, उपाध्यक्ष निलेश बद्देलवार, कोषाध्यक्ष सचिन चुलुरवार, विजेंद्र कंठीवार, अविनाश विश्रोजवार, राकेश राचमलवार, रविंद्र किरमीरवार, रविंद्र शुद्धलवार, रविंद्र श्रीपदवार, योगेश देवोजवार, सचिन देवोजवार, टिकेश श्रीपदवार आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात चिमुकल्यांनी अतिशय सुंदर नृत्य सादर करून उपस्थितांचे मन जिंकले. मान्यवरांच्या हस्ते त्यांना प्रमाणपत्र आणि बक्षिसांचे वितरण करण्यात आले.
या भव्य सोहळ्याला पांचाळ समाज बांधव, महिला आणि बालगोपाळ मोठ्या संख्येने उपस्थित होते. धार्मिक उत्साह, सांस्कृतिक कार्यक्रम आणि सामाजिक एकतेचा संदेश देणाऱ्या या महोत्सवाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला.