Home Breaking News *मुलं वाचलेलं विसरतात ?* *मग अशी वाढवा स्मरणशक्ती*

*मुलं वाचलेलं विसरतात ?* *मग अशी वाढवा स्मरणशक्ती*

120

 

*मुलं वाचलेलं विसरतात ?*

 

*मग अशी वाढवा स्मरणशक्ती*

 

*जानेवारी ते एप्रिल हा काळ मुलांचे टेन्शन वाढवणारा काळ असतो. कारण वा महिन्यांपासून मुलांच्या परीक्षा सुरू होतात. त्यामुळे मुलांसोबत पालकांचीही परीक्षा असते, असे म्हणने चुकीचे ठरणार नाही. त्यात काही मुलांची आकलन शक्ती, चांगली असते तर काहींना कितीही प्रयत्न केले तरी केलेले पाठांतर लक्षात राहत नाही अशा पालकांसाठी मुलांचा अभ्यास घेणे मोठे कठीण काम असू शकते , त्यामुळे आज आम्ही तुमाला मुलाची स्मरणशक्ती कशी वाढवावी याबद्द सोया टिप्स सांगणार आहेत.*

*उपाय बऱ्याच वेळा मुलांना वाचन, पाठांतर करणे कंटाळवाणे वाटते. अशा वेळी तुम्ही अभ्यासातील काही गोष्टी कवितेच्या लयबंधतेत शिकवू शकता. या ट्रिकमुळे मुलांचा अभ्यास लक्षात राहू शकतो.*

 

*योग्य आहार मुलांची स्मरणशक्ती वाढविण्यासाठी त्यांच्या आहाराकडे लक्ष द्यायला हवे. कारण काही पदार्थ मुलांच्या मेंदूला चालना देऊ शकतात. असे पदार्थ खाल्ल्याने मेंदूच्या विकासाला चालना मिळते आणि स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते.*

 

*अंडी अड्यांमध्ये कोलीन असते. कोलीनमुळे मेंदूच्या विकासाला चालना मिळते. ज्यामुळे मेंदूच्या पेशी निरोगी ठेवण्यासाठी मदत मिळते.*

 

*ब्राऊन राईस, गहू, पालेभाज्या ब्राऊन राइस, गव्हाचा आहारात समावेश करावा, या पदार्थांमध्ये कार्बोहायड्रेट्स भरपूर प्रमाणात आढळतात, जे मेंदूच्या विकासासाठी फायदेशीर असतात. हिरव्या पालेभाज्यांमध्ये व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन ई मुबलक प्रमाणात आढळते. या भाज्यांच्या सेवनाने मुलांची स्मरणशक्ती वाढते. मुलांच्या आहारात पालक, ब्रोकोली, भाज्यांचे सॅलेड यांचा समावेश तुम्ही करू शकता. दूध आणि दही मुलांना खायला द्यावे. दुधातील कॅल्शियम, प्रोटीन मेंदूच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात.*

 

*शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित ठिकाणे, प्राणीसंग्रहालय अशा ठिकाणी मुलांना घेऊन जावे. प्रत्यक्षात पाहिल्या जाणाऱ्या गोष्टी मुलांच्या लवकर लक्षात राहतात. पालकांनी मुलांशी नीट, शांतपणे बोलून त्यांची दररोज रिव्हिजन घ्यावी.*

 

🌱 *संकलन*🌱🙏🏻 *रजनी रामगिरवार*🙏🏻

☘️ *आरोग्यनिशी समुह*☘️

8️⃣3️⃣0️⃣8️⃣0️⃣1️⃣3️⃣5️⃣2️⃣1️⃣

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

Don`t copy text!