संत रोहीदास महाराजांच्या विचारांचा अंगिकार करा माजी नगराध्यक्षा योगीताताई पिपरे यांचे प्रतिपादन
गडचिरोली दि. 12 फेब्रुवारी 2025
श्री. संत रविदास महाराज चर्मकार समाज मंडळ, गडचिरोलीच्या वतीने आज दि. 12 फेब्रुवारी 2025 रोजी समाज मंदिरात श्री संत रविदास महाराज जयंती महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यकमाचे उद्घाटन माजी नगराध्यक्षा योगीताताई पिपरे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून अनिल तिडके, श्री संत रविदास महाराज चर्मकार समाज मंडळाचे जिल्हाध्यक्ष नथुजी अंडेलकर, मंडळाचे माजी सचिव सावजी बरिया, सल्लागार नामदेव काटवले, मोरेश्वर म्हशाखेत्री, वामन म्हशाखेत्री, राजेश्वर म्हशाखेत्री, खोब्रागडे इत्यादी उपस्थित होते.
यावेळी सर्वप्रथम माजी नगराध्यक्षा योगीताताई पिपरे यांच्या हस्ते संत रविदास महाराजांच्या प्रतिमेचे पुजन करून त्यांना मार्लापण करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करतांना माजी नगराध्यक्षा योगीताताइ पिपरे यांनी सांगीतले की, संत रोहीदास महाराज यांची आज 648 वी जयंती आपण साजरी करीत आहात, हि अभिमानास्पद बाब आहे. संत रोहीदास महाराज एक थोर समाज सुधारक होते त्यांनी समाजाच्या उत्थानासाठी व प्रगतीसाठी अथक परिश्रम घेतले. ते कोणत्याही सामाजाचा भेदभाव न करणारे महान समाज सुधारक होते. त्यांच्या कार्याचा प्रसार करून त्यांचे विचार अंगिकारणे आवश्यक असल्याचे यावेळी त्यांनी सांगीतले. याप्रसंगी इतर मान्यवरांनी समाज बांधवांना मोलाचे मार्गदर्शन केले.
जयंती महोत्सव यशस्वी करण्यासाठी श्री. संत रविदास महाराज चर्मकार समाज मंडळाच्या पदाधिकारी व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.