राष्ट्रीय स्पर्धेत रितीक सतिश आयलवारचे सुयश
गडचिरोली: वृत्तवाणी न्युज
भारतीय व्यवस्थापन संस्था (आय.आय.एम.)व देशातील सर्वोच्च ‘ब’ श्रेणीतील संस्था यांच्या स्तरावरील सर्व विध्यार्थ्यासाठी आयोजित केलेल्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेमध्ये आय.आय.एम. बंगलोर येथील विद्यार्थी रितीक सतिश आयलवार यांनी सुयश प्राप्त करून या स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला असून प्रशस्तीपत्र व दोन लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर झाले आहे. जागतिक व्यवसायांना आव्हान व त्यांना सामोरे जाण्यासाठी तांत्रिक कौशल्य आणि उद्योगविषयक अंतरदृष्टी धोरणात्मक कौशल्य या विषयावर सदर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. सदर स्पर्धा देशातील 21 आय.आय.एम. चे विद्यार्थी व देशातील ‘ब’श्रेणीतील सर्वोत्तम 20 विद्यालयातील विद्यार्थ्यांकरिता आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत 10 हजार 516 विद्यार्थ्यांर्थी सहभागी झाले होते.
रितीक सतिश आयलवार हा आय.आय.एम. बंगलोर मध्ये एम.बी.ए. अंतीम वर्षांचा विद्यार्थी असून तो गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा मुलगा आहे.रितीकचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.