विचारांची देवाण-घेवाण करण्यासाठी सामाजिक कार्यकम आवश्यक
माजी नगराध्यक्षा योगिताताई पिपरे यांचे प्रतिपादन
गडचिरोली दि. 12 फेब्रुवारी 2025
विश्वकर्मा पांचाळ समाज इंदिरानगर, गडचिरोली च्या वतीने भगवान विश्वकर्मा मंदिर इंदिरानगर येथे भगवान विश्वकर्मा जयंतीचा कार्यकम उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यकमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्षा तथा भाजपाच्या जिल्हा महामंत्री योगिताताई पिपरे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून स्नेहा येरोजवार, सुवर्णा कंचर्लावार, शितल पगडपल्लीवार, कल्याणी येलपुलवार, वेणू शुध्दलवार, वंदना कागदेलवार, अरूणा नेवारे, प्रकाश येराजवार, अतुल राचमलवार, अरुण पगडपल्लीवार, संतोष मुरमुरवार, संजय बघेलवार, संदिप येलपुलवार, शेषराव कंचर्लावार, अनिल शुध्दलवार उपस्थित होते.
यावेळी अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करतांना माजी नगराध्यक्षा योगिताताई पिपरे म्हणाल्या, भगवान विश्वकर्मा यांचे कार्य मोलाचे आहे. त्यांनी समाजाला चांगला संदेश दिला आज आपण त्यांची जयंती साजरी करित आहोत ही अतिशय आनंदाची बाब आहे. अशा कार्यकमाच्या माध्यमातुन समाज बांधवांचे एकत्रीकरण होते व विचारांची देवाण-घेवाण होते. त्यामुळे समाज बांधव व महिलांनी एकत्र येवून नियमित अशा कार्यकमाचे आयोजन करावे, असे त्यांनी सांगीतले.
कार्यकमाच्या यशस्वितेसाठी सुनिल बघेलवार, नितीन राजुरवार, अशोक यमर्जुरवार, राजु मुरमुरवार, प्रशांत बघेलवार, विजय येरोजवार, बंडु उमरगुंडावार, राजेंद्र कंदीकुरवार, माधुरी सजनपवार, सुरेखा बघेलवार, ज्योती मुरमुरवार, माधुरी बघेलवार, किर्ती बघेलवार, माधुरी कंदीकुरवार, पिंकी राचमलवार, कुंदा विरवार व इतर समाज बांधव व महिलांनी सहकार्य केले.






