Home Breaking News नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा रामपूर ,गडचिरोली येथे धर्मसेवा प्रतिष्ठान तर्फे वैद्यकीय...

नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा रामपूर ,गडचिरोली येथे धर्मसेवा प्रतिष्ठान तर्फे वैद्यकीय तपासणी

175

 

नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा रामपूर ,गडचिरोली येथे धर्मसेवा प्रतिष्ठान तर्फे वैद्यकीय तपासणी

 

गडचिरोली दि. २४ फेब्रुवारी २०२५

गडचिरोली येथील नगर परिषद उच्च माध्यमिक शाळा, रामपूर, गडचिरोली येथे धर्मसेवा प्रतिष्ठान या न्यासाच्या वतीने दिनांक २४ फेब्रुवारी २०२५ रोजी वैद्यकीय तपासणी करण्यात आली.यावेळी विदयार्थ्यांची सिकलसेल तपासणी करण्यात आली. या वैद्यकीय तपासणीचा लाभ ५७ विद्यार्थ्यांनी घेतला. यावेळी नगर परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.नैना चन्नावार यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

समाजसाहाय्य, राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी कार्यरत धर्मसेवा प्रतिष्ठान या न्यासातर्फे विविध समाजोपयोगी व विविध समाजाभिमुख कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.

न्यासातर्फे गरजूना कपडे वाटप, अन्नदान, नैतिकमूल्य संवर्धन कसे करावे ,ताणतणावमुक्त जीवन कसे जगावे याविषयी प्रबोधन, वैद्यकीय तपासणी असे विविध समाजोपयोगी उपक्रम घेण्यात येतात त्याचाच एक भाग म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी न्यासाच्या वतीने सौ. प्रगती मामीडवार या सहभागी झाल्या होत्या. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या काॅन्सिलर सौ. निता बालपांडे तपासणी करणारे स्वप्निल चापले यांनी हा वैद्यकीय तपासणीचा कार्यक्रम घेतला.

आपली नम्र

सौ. प्रगती मामीडवार

९६५७९९१०८७

Don`t copy text!