Home Breaking News पोलिस कमांडो वॉरियर्सचा थरारक विजय!

पोलिस कमांडो वॉरियर्सचा थरारक विजय!

94

पोलिस कमांडो वॉरियर्सचा थरारक विजय!

 

गडचिरोली, ता. २४ : गडचिरोली डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग (GDPL) २०२५ अंतर्गत एमआयडीसी मैदानावर खेळविण्यात आलेल्या तिसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात पोलिस कमांडो वॉरियर्स संघाने अत्यंत उत्कंठावर्धक लढतीत सिरोंचा नाइट रेंजर्सचा १ गडी राखून पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला.

या रोमांचक सामन्यात सिरोंचा नाइट रेंजर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. संघाने १९ षटकांत सर्वबाद १५५ धावा केल्या. अजाज कुरेशीने ३८ चेंडूत ५४ धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली, तर करण पीने ३२ चेंडूत ४० धावा फटकावल्या. पोलिस कमांडो वॉरियर्सच्या गोलंदाजांनी प्रभावी कामगिरी केली, विशेषतः पंकज नाकतोडेने ४ षटकांत केवळ ११ धावा देत ६ विकेट्स घेतले. पुनमकुमार वंजारीने ४ षटकांत २४ धावा देत ३ विकेट्स बाद केले. प्रत्युत्तरादाखल पोलिस कमांडो वॉरियर्स संघाने २० षटकांत ९ गड्यांच्या मोबदल्यात १५९ धावा करून विजय मिळवला. मनोज धुर्वेने आक्रमक फलंदाजी करत २८ चेंडूत ६३ धावा काढल्या. मंगेश राऊतने २५, जितेंद्र कोरेटीने नाबाद १८ आणि संदीप केमारेने नाबाद १५ धावा करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. सिरोंचा नाइट रेंजर्स संघाकडून अजाज कुरेशीने ४ षटकांत २८ धावा देत ३ विकेट्स घेतले, तर करण पीने ३ षटकांत १३ धावांत २ विकेट्स बाद केले. सामन्यातील उत्कृष्ट गोलंदाजीसाठी पंकज नाकतोडे याला ‘सामन्याचा सर्वोत्कृष्ट खेळाडू’ (Man of the Match) पुरस्काराने गौरविण्यात आले. सिरोंचा नाइट रेंजर्स संघाला चांगल्या कामगिरीसाठी एक लाख ११ हजार १११ रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला. पोलिस कमांडो वॉरियर्स संघाच्या विजयामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये आनंदोत्सव पाहायला मिळाला असून आता उपांत्य सामन्याची उत्कंठा वाढली आहे. गडचिरोली जिल्हा प्रीमियर लीगच्या रोमांचक प्रवासात पुढील सामने अधिक चुरशीचे ठरणार आहेत.

Don`t copy text!