तोडसा येथे जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम
एटापल्ली ता.प्र.
ग्रामपंचायत कार्यालय तोडसा तर्फे जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे उदघाटन संवर्ग विकास अधिकारी डॉ. आदिनाथ आंधळे तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच वनिता कोराम तर प्रमुख अतिथी उपसरपंच प्रशांत आत्राम,विस्तार अधिकारी साईनाथ साळवे होते.
सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जेष्ठ महिलांचा साळी चोळी देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात घरकुल बांधकाम विषयी माहिती देण्यात आली.
कार्यक्रमाचे संचालन प्रास्ताविक ग्रामविकास अधिकारी रमेश बोरकुटे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दिनेश तीमा,नामदेव दुर्गे,रमेश तिमा यांनी पुढाकार घेतला.यावेळी महिला बचतगट प्रतिनिधी, अंगणवाडी सेविका, गावातील महिला पुरुष बहुसंख्येने उपस्थित होते.






