Home Breaking News *जागतिक महिला दिना निमित्य भाजपा महिला मोर्चातर्फे कर्तृत्ववान नारी शक्तींचा सन्मान*

*जागतिक महिला दिना निमित्य भाजपा महिला मोर्चातर्फे कर्तृत्ववान नारी शक्तींचा सन्मान*

111

*जागतिक महिला दिना निमित्य भाजपा महिला मोर्चातर्फे कर्तृत्ववान नारी शक्तींचा सन्मान*

 

दिनांक : – ८ मार्च २०२५

 

 

गडचिरोली : – भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हाध्यक्ष सौ.गीताताई हिंगे यांच्या नेतृत्वात महिला दिनाचा कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला.

यावेळी निरनिराळ्या क्षेत्रात स्वतःचे अस्तित्व सिद्ध करणाऱ्या नारी शक्तींचाही यावेळेस सत्कार व गौरव करण्यात आला.

 

 

भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ.गीताताई हिंगे यांच्या जनसंपर्क कार्यालयात महिला दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिलांनी हिरीरीने सहभाग घेऊन कार्यक्रमाला उत्सुर्फ प्रतिसाद दिला.

 

यावेळी कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मा. वैशाली नरोटे, मा. अर्चनाताई नेते, मा. यशोधरा ताई उसेंडी तसेच चंदाताई कोडवते लाभलेल्या होत्या .

 

यावेळी विशेष म्हणजे जिल्ह्यातून विविध मंडळातून आलेल्या महिला पदाधिकाऱ्यांना गुलाबाचे फुल व भेट वस्तू देऊन सन्मान करण्यात आला.

 

यावेळी नर्सिंग क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरीबद्दल राष्ट्रपतींच्या हस्ते नर्सिंग क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार समजला जाणारा फॉरेन्स नाइटिंगल पुरस्कार देऊन गौरविण्यात आलेल्या गडचिरोलीच्या निवृत्त परिचारिका शालिनी ताई निंबार्ते तसेच गडचिरोलीतील पहिली महिला पत्रकार व नुकत्याच व्हॉईस ऑफ मिडिया महिला विंग ची महाराष्ट्रा प्रदेश उपाध्यक्ष म्हणून निवड झालेल्या तिलोत्तमा हाजरा व पती निधनानंतर LIC मध्ये विशेष ओळख निर्माण करणाऱ्या , अतिशय हलाखीची परिस्थिती असूनही घराची धुरा स्वतःच्या खांद्यावर घेऊन मुलाच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणाऱ्या सुनीता आलेवर अशा कर्तृत्वान महिलांचा भाजपा महिला मोर्चातर्फे शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

 

“महिलांनी आजच्या काळात कुठेही मागे न राहता समोर येऊन आपल्या आवडीच्या क्षेत्रात नाव कमवावे, महिलांनी आजच्या घडीला कमजोर न बनता प्रत्येक समस्येला धैर्याने तोंड द्यावे.

 

*तुझ्या उत्तुंग भरारी पुढे*

*गगन ही ठेंगणे भासावे,*

*तुझ्या विशाल पंखाखाली*

*विश्व ते सारे वसावे….*

 

आज सर्वत्र जगभर महिला दिन साजरा होत आहे. आज भारतातील स्त्री प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगतीपथावर आहे . शेतीतील मजुरापासून ते देशाच्या राष्ट्रपती पदापर्यंत, तसेच शिक्षिका, डॉक्टर ,पोलीस, पोलीस निरीक्षक, तलाठी, ग्रामसेविका ,पायलट ,खेळाडू अशा अनेक क्षेत्रात महिलांनी मोलाची कामगिरी बजावली आहे. आपल्या भारत देशामधील अनेक महिलांनी विविध क्षेत्रात आपले नाव कमावले आहे.

 

त्यामुळेच कुणाच्या आधाराची वाट न बघता महिलांनी समोर येऊन स्वतःला सिद्ध करायला हवे, असे प्रतिपादन भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ.गीताताई हिंगे यांनी केले.

 

 

मा. अर्चनाताई नेते यांनी महिलांना मार्गदर्शन करतांना म्हणाल्या प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते असे म्हटले जाते, हे सिद्ध करणारी अनेक उदाहरणे आपल्या समाजात आहेत स्त्री शिक्षणाची महती ओळखून स्त्री शिक्षणाचा वारसा हाती घेतलेल्या महात्मा फुले यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी स्वतः शिकून वारसा चालवला.

मा. यशोधराताई उसेंडी महिलांना संबोधित करताना बोलल्या की माँ जिजाऊंनी लहानपापासून जसे संस्कार करून शिवबाला घडविले की आज आपण त्यांना महाराष्ट्राचे आराध्य दैवत मानतो. त्याचप्रमाणे प्रत्येक पालकाने मुलींसोबत मुलांवर देखील लहानपणापासून घरातून चांगले संस्कार दिले तर आज समाजात घडण्याऱ्या अनुचित घटनांचे प्रमाण कमी होईल.आ. नरोटे ताई , चंदाताई कोडवते यांनीही महिलांना यथोचित मार्गदर्शन करून सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी कार्यक्रमाला महिला मोर्चा जिल्हा महामंत्री रोशनीताई वरघंटे,महिला मोर्चा जिल्हा महामंत्री शालिनी पोहनेकर, कोरचीच्या महिला मोर्चा तालुकाध्यक्ष शिलाताई सोनकोतरी,चामोर्शी महिला मोर्चा शहर अध्यक्ष कविताताई किरमे ,पद्मा सडमेक,महिला मोर्चा तालुकाध्यक्ष अहेरी, लक्ष्मीताई कलंत्री,पल्लविताई बारापात्रे,अर्चनाताई निंबोळ ,अल्काताई पोहनकर , रेखाताई उईके, मंदाताई मांडवगडे, अनिताताई विश्रोजवार, प्रतिभाताई चौधरी, कोमल बारसागाडे, भारती खोब्रागडे,अंजली देशमुख, संगीता राऊत ,सगुणा काटेंगे,नीलकमल मोहूरले,भूषणा खेडेकर,शुभूताई शातलवार तसेच गडचिरोली शहरातील तसेच मंडळातील अन्य महिला पदाधिकारी तसेच वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या महिला यावेळी उपस्थित होत्या.सर्व महिला पदाधिकाऱ्यांना महिला दिनानिमित्य महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष. गीताताई हिंगे यांच्याकडून भेट वस्तू देण्यात आली.या संपुर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वैष्णवी डोंगरे व प्रतिमा सोनवणे यांनी तर आभारप्रदर्शन महिला मोर्चाच्या जिल्हा महामंत्री रोशनीताई वरघंटे यांनी केले.

Don`t copy text!