लग्नाच्या अठराव्या दिवशी एका नवविवाहित तरुणीने संपविले आपले जीवन
कुरखेडाचे ता.प्र.
तालुका मुख्यालयापासून दहा की.मी.अंतरावर असलेल्या पांडुटोला येथील नवविवाहित तरुणीने लग्नाच्या अठराव्या दिवशी अंगावरची हळद सुकण्यापूर्वीच विष प्राशन करून आपली जीवनयात्रा संपविली.मन हेलावून टाकणाऱ्या या घटनेने सासर व माहेरच्या संपुर्ण परिसरात व दोन्ही परिवारावर शोककळा पसरली.पांडुटोला येथील आदेश घातघुमर या युवकाचे गोंदिया जिल्ह्यातील पिंडकेपार येथील तोमेश्वरी नामक युवतीशी चोवीस फरवरीला ठाटामातात लग्न झाले. लग्न होऊन ती सासरी आली.दोघेही जण आनंदात आपल्या भविष्याची स्वप्न रंगवू लागली. दरम्यान आठ मार्चला तिच्या माहेरी भाच्याचा वाढदिवस असल्याने तो साजरा करण्यासाठी मोठ्या आनंदाने टूव्हीलरने पिंडकेपारला जाऊन आले.शनिवारी सकाळी साळेनऊच्या सुमारास आपल्या पतीला जेवू घातले.व दुपारचा डब्बा करून दिला.व डब्बा घेऊन आदेश आपल्या कामावर निघून गेला. दरम्यान सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास तोमेश्वरीने विष प्राशन केले असावे त्यामुळे तिच्या नाकातोंडातून फेस येत असल्याचे पाहून तिच्या कटुंबीयांनी तिला कुरखेडा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तिला वाचविण्यासाठी प्रयत्न केले परंतु तिच्याकडून उपचारासाठी प्रतिसाद मिळत नव्हता. शेवटी तिचा मृत्यू झाला. आज सकाळी शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह तिच्या कटुंबीयाकडे सोपविण्यात आला . पुढील तपास कुरखेडा पोलिस करीत आहेत.







