शेकडो टॅक्सी चालक मालक यांनी विविध समस्या बाबत सुरेंद्रसिहं चंदेल याची भेट घेतली
गडचिरोली जिल्ह्यातील सर्वच भागातील शेकडो टॅक्सी चालक मालकानी आज कामगार नेते, माजी जिप सदस्य सुरेंद्रसिहं चंदेल यांची गडचिरोली येथे भेट घेऊन त्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्या सांगितल्या.
प्रत्येक शासकीय कामात टॅक्सी चालक सरकारला मदत करीत असतात, निवडणुकी मध्ये नक्सलग्रस्त भागात हेच टॅक्सी चालक निवडणूक कर्मचाऱ्यांना घेऊन जाणे व आणण्याचे काम करतात, परंतु त्यांच्या समस्याकडे शासन पाहिजे त्या प्रमाणे लक्ष देत नाही.
या वेळी सुरेंद्रसिहं चंदेल यांनी सर्व समस्या ऐकून त्या सोडविण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करणार असून आपण मागील 30 वर्षापासून सदैव टॅक्सी चालक मालक यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले.
या वेळी सुरेंद्रसिहं चंदेल यांचे सह शिवसेना महिला आघाडी प्रमुख छायाताई कुंभारे, अविनाश गेडाम, नंदूभाऊ चावला, रोशन नंदनवार, जावेद शेख, नंदू नव्हाटे, सतीश, चान्नावर, व संपूर्ण जिल्हाभरातून आलेले टॅक्सी चालक, मालक उपस्थित होते.






