गडचिरोली पोलीस दलाने नवनिर्मित पोस्टे कवंडेच्या स्थापनेच्या दिवशीच कवंडे परिसरातील माओवाद्यांची स्मारके केली उध्वस्त
श्व् मिडदापल्ली ते कवंडे रत्यावर माओवाद्यांनी उभारली होती स्मारके
माओवाददृष्ट¬ा अतिसंवेदनशील गडचिरोली जिल्हा दुर्गम-अतिदुर्गम भाग असलेला आहे, ज्या ठिकाणी बरेच आदिवासी बांधव आज देखील विकासापासून दूर आहेत, त्यंाचा विकास साधावा व माओवाद्यांच्या कारवायांना आळा बसावा यासाठी गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने काल दिनांक 09/03/2025 रोजी उपविभाग भामरागड अंतर्गत मौजा कवंडे येथे नवीन पोलीस स्टेशनची स्थापना करण्यात आली.
सदर नवीन पोलीस स्टेशन उभारणीच्या कार्यवाहीदरम्यान मिडदापल्ली ते कवंडे रत्यावर पोलीस स्टेशन निर्मितीच्या अगोदरच्या काळातच माओवाद्यांनीे स्मारके बांधलेली असल्याचे गडचिरोली पोलीस दलाच्या निदर्शनास आले होते. सामान्य नागरिकांच्या मनात दहशत निर्माण करण्यासाठी आणि परिसरात आपल्या अस्तित्वाची जाणीव करुन देण्यासाठी माओवाद्यांकडून सदर स्मारकांची निर्मिती करण्यात आली होती. यावरुन मा. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली पोलीस दलाच्या बिडीडीएस व विशेष अभियान पथकाच्या पथकातील जवानांनी सदर परिसरात शोध अभियान सुरु केले. यादरम्यान मिडदापल्ली ते कवंडे रत्यावर तसेच पोस्टे कवंडेच्या शेजारील परिसरात एकुण 04 स्मारके माओवादयांनी बांधलेली असल्याचे दिसून आले. सदर माओवादी स्मारकांची व परिसराची बिडीडीएस पथकाने कसून तपासणी केली व त्यानंतर विशेष अभियान पथकातील जवानांनी माओवाद्यांनी बांधलेली सर्व स्मारके उध्वस्त केली गेली आहेत. माओवाद्यांचे आश्रयस्थान समजल्या जाणाया अतिदुर्गम भागांमध्ये पोमकें पेनगुंडा व पोस्टे नेलगुंडा, कवंडेची स्थापना करून तसेच माओवाद्यांची स्मारके उध्वस्त करून गडचिरोली पोलीस दलाने परिसरातील नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण केली आहेे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. एम. रमेश व अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) श्री. एम. व्हि. सत्यसाई कार्तिक, पोलीस उप-अधीक्षक (अभियान) श्री. विशाल नागरगोेजे व उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागड श्री. अमर मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली. यावेळी पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांनी सांगितले की, “या भागात माओवादविरोधी अभियान तीव्र केले असून, माओवाद्यांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष केंद्रित केले जात आहे.” यासोबतच “अशा माओवाद्यांच्या स्मारकाला समाजात कुठेच स्थान नसून कोणीही अशा बेकायदेशीर बांधकामांमध्ये सहभागी होऊ नये” असे आवाहन केले आहे.






