कोरोना महामारी मध्ये खाजगी कान्व्हेंट मधील फ़ी माफ़ करा :- राजु झोडे
फ़ी माफ़ करा अन्यथा बोर्डा ची परिक्षा होवू देणार नाही : वचिंत बहुजन आघाडी
कोरोना महामारी च्या काळात सन २०२०-२१ या सत्रात सर्व खाजगी कॉन्व्हेंट आजतागायत बंद होते,पण शासनाने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्वाचा उपयोग करून काही खाजगी कॉन्व्हेंट सुरू करण्यात आले.पण कॉन्व्हेंट बंद असतांना ओनलाईन शिक्षण देण्याचा नावाखाली या खाजगी शाळांच्या व्यवस्थापनांनी पालकांना वर्षभराची फी भरा अन्यथा परीक्षेला बसू देणार नाही,असा तगादा पालकांना लावल्याने या आर्थिक हलाखीच्या परिस्थितीत शाळांची फी भरावी कशी?असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या दरम्यान सर्वसामान्य जनतेची आर्थिक घडी पुर्णपणे उध्दवस्त झालेली आहे.महत्वाची बाब म्हणजे वर्ष भर शाळा सुरुच न झाल्याने शाळांची व्यवस्थापकीय खर्चाची बरीच बचत झाली आहे . तरी सुध्दा कॉन्व्हेंट चे व्यवस्थापण विद्यार्थी व पालकांना बळजबरीने फी भरण्याचा तगादा लावत आहे.फि भरा अन्यथा परीक्षेला बसु देणार नाही,अशी धमकी दिल्या जात आहे . कोरोना महामारीमुळे सर्वांचीच आर्थिक घडी उध्दवस्त झाल्याने सन २०२०-२१ चे शैक्षणिक फी माफ करण्यात यावी या मागणी करीता दिनांक 16 मार्च रोजी नगर पालिका चौकात धरणे आंदोलनाचे आयोजन केले असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे नेते राजू झोडे यांनी पत्रपरिषदेत सांगितली.
स्थानिक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्राम गृहात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत राजू झोडे यांनी खाजगी कॉन्व्हेंट चे व्यवस्थापक विध्यार्थ्यांचा कसा मानसिक छड करतात?फी भरण्यासाठी पालकांना कोणत्या स्थरावर जाऊन बळजबरी करतात?या कडे पत्रकारांचे लक्ष वेधले.
एकीकडे वर्षभरा पासून शाळा बंद,तर दुसरीकडे सर्वसामान्य जनतेला या कोरोना काळात होत असलेली दमछाक,आणि कॉन्व्हेंट व्यवस्थापकांची मुजोरी,हे अत्यंत गंभीर मुद्दे असल्याचे सांगत विद्यार्थ्यांची संपूर्ण फी माफ करा या मागणी साठी धरणे आंदोलन करीत असल्याचे त्यांनी सांगितले.या धरणे आंदोलनात कॉन्व्हेंट मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जास्तीत पालकांनी हजर राहण्याचे आवाहनही या वेळी राजू झोडे यांनी केले.खाजगी कान्व्हेंट मधील फी माफ करण्यात यावी यासाठी येत्या १६ मार्च २१ ला धरणा आंदोलनाचे आयोजन केले आहे याची माहिती देतांना मा.राजुभाऊ झोडे विदर्भ समन्वयक वंचित बहुजन आघाडी सोबत प्रशांत झामरे, संपत कोरडे, संदेश करवाडे,फिरोज खान, झाकीर खान, पंकज बोनगीरवार,विकास कोवे, प्रवीण धोपटे, नालंदा भगत, दांडेकर, सुरेश हजारे, स्मिता ढेंगळे, आदी हजर होते.