आदिवासी विध्यार्थी संघाच्या प्रयत्नाने तुमनूर येतील म्रुत्यू महिलाच्या शव पोहचला घरी
◼️जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या पुढाकार व आर्थिक मदत,
🔸सिरोंचा:- तालुक्यांतील तुमनूर चेक येतील महिला अंकुबाई चूक्कया निष्ठुरी वय ६० वर्ष हि एका आठवड्यापासून आजारी होती,सदर महिलेला उपचारांसाठी अहेरी येतील उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले होते,आज सदर महिला मय्यत झाली आहे.
घरांची परिस्थिती हलखीचे असल्याने अहेरी वरून तुमनूर ला शव कसे घेवुन जावे अशी अड़चन निर्माण झाली होती.
सदर महिलाच्या डेथ बाडी नेण्यासाठी गाडी उपलब्ध नव्हती अशावेळी काय करावे हे नातेवाईकांना कळत नव्हता,
सदर बाब आदिवासी विद्यार्थी संघाचे तुमनूर चेक येतील माजी सरपंच श्री.किरण वेमूला यांना माहिती मिळाली त्यांनी सदर बाब भ्रमणध्वनी वरून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांना माहिती दिली.व आपभिती सांगितले.असता जि.प.अध्यक्ष गडचिरोली येते असल्याने अहेरी येतील कार्यकत्याना सांगितले असता आज सकाळी सदर महिलेच्या म्रुत्यूदेह अहेरी वरून सिरोंचा तालुक्यातील तुमनूर नेण्यासाठी स्वखर्चातून गाडीची व्यवस्था व आर्थिक मदत आदिवासी विध्यार्थी संघाकडून करण्यात आले असुन यावेळी अहेरी पंचायत समितीचे सभापती श्री.भास्कर तलांडे,आदिवासी विध्यार्थी संघाचे शहर अध्यक्ष श्री.प्रशांत गोडसेलवार,राकेश सड़मेक,श्री.सुदामा हलदर,प्रकाश दुर्गे, यांनी रूग्णालयात जावून शव गाडीने तुमनूर येते पाठवण्यात आले आहे.







