नगरपंचायत व ग्रामपंचायत मध्ये मंजूर झालेल्या घरकुल लाभार्थीना 10 ब्रास रेती देण्याची परवानगी देण्यात यावी शिवसेना माजी जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिह चंदेल यांची मागणी

189

नगरपंचायत व ग्रामपंचायत मध्ये मंजूर झालेल्या घरकुल लाभार्थीना 10 ब्रास रेती देण्याची परवानगी देण्यात यावी
शिवसेना माजी जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिह चंदेल यांची मागणी

गडचिरोली : जिल्ह्यातील प्रत्येक नगरपंचायत व ग्रामपंचायत मध्ये अनेक लाभार्थीना घरकुल मंजूर झालेले आहे.प्रत्येक गावात ग्रामपंचायत मध्ये 50 ते 100 व नगरपंचायत मध्ये 400 ते 500 लाभार्थी आहेत.घरकुल बांधत असताना प्रत्येकाला रेतीची आवश्यकता भासणार आहे.जिल्ह्यातील अनेक भागात रेती घाटाला परवानगी नसल्याने घरकुल बांधकामाकरिता रेती आणायची कोठून असा प्रश्न निर्माण झाला आहे.शासनाने मंजूर केलेले घरकुल मर्यादित वेळी पूर्ण करावे लागते.तरी जिल्ह्यातील मंजूर झालेल्या नगरपंचायत व ग्रामपंचायत मधील लाभार्थीना 5 ते 10 ब्रास रेती नेण्यासाठी परवानगी देण्यात यावी अशी मागणी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिह चंदेल,पुंडलिक देशमुख नगरसेवक यांनी मा.पालकमंत्री एकनाथ शिंदे तथा जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे.