Home Breaking News आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांची पोर्ला गावात विविध विकास कामांना गती —...

आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांची पोर्ला गावात विविध विकास कामांना गती — ग्रामपंचायत इमारतीचे उद्घाटन, ५० लाखांची लायब्ररी जाहीर

193

आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांची पोर्ला गावात विविध विकास कामांना गती — ग्रामपंचायत इमारतीचे उद्घाटन, ५० लाखांची लायब्ररी जाहीर

 

पोर्ला, गडचिरोली | ०५ एप्रिल २०२५

 

आज पोर्ला गावासाठी विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा दिवस ठरला. आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या उपस्थितीत नवीन ग्रामसचिवालय व ग्रामपंचायत इमारतीचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले.

 

या कार्यक्रमात बोलताना आमदार डॉ. नरोटे म्हणाले, “ही इमारत केवळ एक बांधकाम नसून गावाच्या विकासाच्या दिशेने टाकलेलं ठोस पाऊल आहे. पाणीटंचाई, घरकुलं, जलप्रदूषण यांसारख्या समस्यांवर लवकरच उपाययोजना केल्या जातील.”

 

याच कार्यक्रमात त्यांनी पोर्ला गावासाठी ५० लाख रुपयांची सुसज्ज लायब्ररी उभारण्याची घोषणा करून ग्रामस्थांना आनंदाची बातमी दिली. लवकरच या लायब्ररीचं भूमिपूजन होणार आहे.

 

या प्रसंगी चिमूर-गडचिरोली लोकसभेचे खासदार नामदेवजी किरसान, भाजपा ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष श्री अनिलजी पोहनकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री. रत्नदीप पाटील म्हशाखेत्री, भाजपा आयटी सेल प्रमुख श्री अविनाशजी महाजन, गट विकास अधिकारी गोंगले साहेब, ग्रामविकास अधिकारी डी.के. लाटेवार, सरपंच निवृत्ता राऊत, उपसरपंच सुमित राऊत आणि ग्रामपंचायत सदस्य व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

तत्पूर्वी, आमदार डॉ. नरोटे यांनी श्री महर्षी वाल्मिकी सभागृह, पोर्ला येथे सदिच्छा भेट देऊन भोई समाज बांधवांशी संवाद साधला. समाजाच्या अडचणी जाणून घेतल्या व त्या सोडवण्यासाठी सकारात्मक भूमिका घेण्याचं आश्वासन दिलं.

 

महर्षी वाल्मिक ऋषी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून आशीर्वाद घेत, “समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असं डॉ. नरोटे यांनी सांगितलं.

 

या कार्यक्रमाला श्री अनिलजी पोहनकर, श्री रत्नदीप पाटील, श्री अविनाश महाजन, राऊत साहेब, आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

 

“तुमच्या गरजा, समस्या मोकळेपणाने मांडा — आम्ही तुमच्या सोबत आहोत!” या शब्दांत आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी गावकऱ्यांशी आपुलकीचं नातं जपलं.

Don`t copy text!