*गडचिरोलीत नव्या सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन — आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्याकडून १० लाखांचा निधी जाहीर*
गडचिरोली | ०५ एप्रिल २०२५
गडचिरोली शहराच्या शैक्षणिक प्रगतीसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आलं आहे. आज कन्नमवार वॉर्ड, गडचिरोली येथे नगरपरिषद सार्वजनिक वाचनालय इमारतीच्या लोकार्पण सोहळा आणि जगद्गुरु तुकोबाराय सार्वजनिक वाचनालयाच्या नवीन ग्रंथालयाच्या उद्घाटन प्रसंगी आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं.
या कार्यक्रमात बोलताना आमदार डॉ. नरोटे म्हणाले,
लायब्ररीसाठी ५ लाखांची अपेक्षा होती, पण शैक्षणिक क्रांतीसाठी मी १० लाख रुपयांचा निधी जाहीर करत आहे.”
ते पुढे म्हणाले, “वाचनालय केवळ पुस्तके नसतात, ती विचारांची शस्त्रं असतात. शस्त्र नव्हे, शास्त्र हेच खरे सामर्थ्य आहे.”
या भूमिकेवर विश्वास ठेवून, लायब्ररीमध्ये IAS, IPS, MPSC, UPSC परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना घडवण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
डिजिटल ट्रेनिंग, ओरिएंटेशन प्रोग्राम्स, आणि मार्गदर्शन सत्रं लवकरच सुरू होणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
लायब्ररीत संध्याकाळी एकत्र येणाऱ्या ज्येष्ठांच्या चर्चेवरून प्रेरणा घेऊन ही ज्ञानयात्रा सुरू करण्यात आली आहे.
या कार्यक्रमाला भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री अनिलजी पोहनकर,
नगरपरिषद मुख्याधिकारी श्री सूर्यकांतजी पिदुरकर,
माजी नगरसेवक श्री गुलाबरावजी मडावी,
श्री शालिग्राम विधाते, दादाजी चुधरी, लडके सर,
व अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमाने गडचिरोलीत ज्ञानविकासाची नवी दिशा देण्यास सुरुवात झाली असून,
शिक्षण आणि संधी यांची दारं सामान्य विद्यार्थ्यांसाठी खुली करण्याचा संकल्प आमदार डॉ. नरोटे यांनी व्यक्त केला.






