*आरमोरी विधानसभा क्षेत्रात भावी आमदार निवडून आणायचे असेल तर जिल्हा परिषद व पंचायत समिती काबीज करा.*

50

*आरमोरी विधानसभा क्षेत्रात भावी आमदार निवडून आणायचे असेल तर जिल्हा परिषद व पंचायत समिती काबीज करा.*

 

*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आरमोरी येथील बैठकीत जिल्हाध्यक्ष रवी भाऊ वासेकर यांचे प्रतिपादन**.

 

*शिवसेनाच्या माजी जिल्हा परिषद सदस्य कुसुमताई रणदिवे व प्रहारच्या महिला तालुकाध्यक्ष गराडे ताई यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश*

आरमोरी =. आगामी निवडणूक लक्ष विचारात घेता आरमोरी विधानसभा क्षेत्रातील जिल्हा परिषदा पंचायत समिती ग्रामपंचायत आणि आरमोरी येथील नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती यामध्ये जोपर्यंत आपली सत्ता येणार नाही तोपर्यंत भविष्यातील आरमोरी विधानसभा क्षेत्राचा भावी आमदार आपण निवडून आणणार नाही यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करावे असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष श्री रवींद्रभाऊ वासेकर यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आरमोरी तालुक्याच्या वतीने आयोजित संघटनात्मक बैठकीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांना अध्यक्षीय मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे नेते माजी आमदार डॉ रामकृष्ण मडावी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष नानाभाऊ नाकाडे ,महिला जिल्हा अध्यक्षा डॉ सोनल कोवें , जिल्हा उपाध्यक्ष दिलीप मोटवानी, समया पसूला माजी जिल्हा परिषद अध्यक्ष, डॉ. चेतन कोवे, तालुका अध्यक्ष अमीन लालानी ,कार्याध्यक्ष सुनील भाऊ नंदनवार , शहर अध्यक्ष प्रदीपजी हजारे , माजी जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या कल्पनाताई तिजारे, कार्याध्यक्ष महिला आघाडी वृषाली ताई भोयर, महिला तालुकाध्यक्ष संगीता मेश्राम, शहर अध्यक्षा जयश्री भोयर, युवा नेते आकाश मडावी,प्रामुख्याने उपस्थित होते.

 

माजी जिल्हा परिषद कृषी सभापती नानाभाऊ नाकाडे मार्गदर्शन करतांना म्हणाले खऱ्या अर्थाने जूने 89व90 सालचे चे मुस्तदि राजकारणी डॉ रामकृष्ण मडावी यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आहे त्याचे अभिनंदन आहे

पुढे बोलताना जिल्हा अध्यक्ष रविभाऊ वासेकर म्हणाले राज्यात जी सत्ता आली आहे ती फक्त लाडक्या बहिणीच्या प्रेमापोटी आली आहे येणाऱ्या काळातील सर्वच निवडणुका आपण स्वबळावर लढवनार आहोत डॉ रामकृष्ण मडावी साहेबांच्या नेतृत्वाखाली संघटन करण्याचे सामर्थ्य आपल्याला मिळाले आहे आरमोरी विधानसभा क्षेत्रात डॉ रामकृष्ण मडावी यांच्या नेतृत्वात विधानसभेची निवडणूक लढवणार आहोत जोपर्यंत आरमोरी विधानसभा क्षेत्रातील पंचायत समिती / जिल्हा परिषदेच्या, नगर परिषद निवडणूक मध्ये विजय मिळवणार नाही तोपर्यंत विधानसभा आपण काबीज करणार नाही त्यासाठी आपण आरमोरी विधानसभा क्षेत्रात राजे धर्मराव बाबा आत्राम यांच्या नेतृत्वात सर्वांनी निवडणुका आपण लढवणार आहोत

राज्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष सुनील तटकरे ,प्रफुल पटेल यांना आपण निवडणुकीच्या प्रचारासाठी आणणार आहोत. आपल्याला आता आपला पक्षाचा संघटन वाढवायचा आहे आणि विविध योजना आणण्यासाठी आपल्याला बळ देण्यासाठी आमचे नेते डॉ.मडावी यांना शक्ती देण्याचे काम आपण सर्व मिळून करू यासाठी आपले सगळ्याचे सहकार्य आवश्यक आहे.यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेत जोपर्यंत नगर परिषदेत आपले 8 ते 10 नगर सेवक निवडून येत नाही तोपर्यंत आपले काम करत आपली सत्ता आणणे आवश्यक आहे.

यावेळी माजी जिल्हा परिषदेचे सदस्या कुसुमताई रणदिवे , प्रहाराच्या महिला आघाडी च्या गराडे, उ. बा. ठा. शिवसैनिक प्रेमनाथ बेहरे, हरिराम, रमेश पगाडे, मोरेश्वर चेल्लीरवार यांनी रवींद्र वासेकर यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश घेतला

डॉ रामकृष्ण मडावी मार्गदर्शन करताना म्हणाले की मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सदस्य झालो आपणही व्हा आणि आपल्याला चांगला आणि सक्षम असा पक्ष मिळाला आहे आणि बाबा आत्राम हे खंबीरपने आपल्या पाठीशी आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढवणार आहोत त्यामुळे आपला पराभव होणारच नाही त्यामुळे सगळ्यानी पक्षाच्या संघटने च्या कामाला लागावे असे आवाहनही यावेळी केले

यावेळी संचालन सुनील नंदनवार यांनी केले तर आभार प्रदीप हजारे यांनी मानले.

सदर संघटनात्मक बैठकीला, राजू आकरे, सुरेंद्र बावनकर, रामदास दहिकर, सुनील बांगरे, प्रफुल राचमलवार, संजय पिंपळकर, दिवाकर गराडे, अक्षय बोरकर, श्रीधर पोटेकर, शाम सपाटे, शुभम वैद्य, अनुज घोसे, आशु भरणे, ललिता भोयर, गीता सपाटे, मनीषा कानतोडे, विद्या मेश्राम, भूमिका बागडे, संगीता घाटूरकर, मनीषा वाकडे, निरंजना चौके, शुभांगी रामटेके, यशोदा गरफडे, उषा हूड, भाग्यश्री शेंदरे आणि तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे महिला व युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.