*कर्तव्य कक्ष क्रमांक ०२ चामोर्शी कार्यालयाचे भव्य उद्घाटन : रामनवमी आणि भाजप स्थापना दिनानिमित्त ऐतिहासिक पाऊल*

60

*कर्तव्य कक्ष क्रमांक ०२ चामोर्शी कार्यालयाचे भव्य उद्घाटन : रामनवमी आणि भाजप स्थापना दिनानिमित्त ऐतिहासिक पाऊल*

 

चामोर्शी — दिनांक ६ एप्रिल २०२५ रोजी रामनवमी आणि भारतीय जनता पक्षाच्या ४५व्या स्थापना दिनाचे औचित्य साधत, गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील *”कर्तव्य कक्ष क्रमांक ०२ – आमदार जनसंपर्क कार्यालय, चामोर्शी”* याचे उद्घाटन _*माजी खासदार व भाजपा राष्ट्रीय महामंत्री (जनजाती मोर्चा) मा. डॉ. अशोकजी नेते*_ यांच्या शुभहस्ते अत्यंत उत्साहात संपन्न झाले.

 

हे कार्यालय फक्त भिंतींचे नाही, तर जनतेच्या अडचणींवर त्वरित कार्यवाही करण्यासाठी, लोकप्रतिनिधी व जनतेमधील संवाद सशक्त करण्यासाठी आणि लोकशाही मूल्यांची उन्नती साधणारे एक प्रभावी व्यासपीठ ठरणार आहे.

 

या उद्घाटन सोहळ्याला भाजपा कुटुंबातील विविध स्तरांतील मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांमध्ये भाजपा किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री रमेशजी बारसागडे, भाजपा तालुका अध्यक्ष श्री आनंदजी भांडेकर, भाजपा महिला मोर्चा जिल्हा महामंत्री व नगरसेविका रोशनीताई वरघंटे, कविताताई किरमे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री अनिलजी तिडके, युवा मोर्चा जिल्हा महामंत्री श्री मधुकरजी भांडेकर, शहराध्यक्ष श्री सोपान नैताम, शहर महामंत्री श्री नरेशजी अलसावर, श्री वासुदेवजी चिचघरे, श्री संजयजी खेडेकर यांचा समावेश होता.

 

या प्रसंगी डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी, पं. दीनदयाळ उपाध्याय, स्व. अटलजी, आ. अडवाणी यांचे स्मरण करण्यात आले आणि त्यांच्या विचारांची प्रेरणा घेत जनसेवेसाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प करण्यात आला.

 

या नव्या कर्तव्य कक्षाच्या माध्यमातून चामोर्शीतील जनतेच्या समस्या अधिक प्रभावीपणे समजून घेत त्या सोडवण्यासाठी विधायक पावले उचलली जातील, असा विश्वास या वेळी सर्व स्तरांतून व्यक्त करण्यात आला.

 

— डॉ. मिलिंद सगुनाबाई रामजी नरोटे